हैदराबाद :Realme P3 Pro 5G, आणि Realme P3x 5G भारतात लाँच झाले आहेत. या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 6,000mAh बॅटरी आहे. Realme P3 Pro 5G स्नॅपड्रॅगन 7s Gen 3 चिपसेटवर चालतो, तर Realme P3x 5G मध्ये अलीकडेच लाँच झालेला MediaTek Dimensity 6400 SoC प्रोसेसर आहे. दोन्ही हँडसेट अँड्रॉइड 15 वर चालतात, तसंच कंपनीचा Realme UI 6.0 वापरकर्ता इंटरफेस देखील यात दिलेला आहे.
Realme P3 Pro 5G किंमत
Realme P3 Pro 5G 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या बेस मॉडेलची किंमत 23,999 रुपयांपासून सुरू होते. हा हँडसेट 8GB+256GB आणि 12GB+256GB व्हेरिएंटमध्ये देखील उपलब्ध आहे ज्यांची किंमत अनुक्रमे 24,999 रुपये आणि 26,999 रुपये आहे. हा हँडसेट गॅलेक्सी पर्पल, नेब्युला ग्लो आणि सॅटर्न ब्राउन रंगात येतो. 25 फेब्रुवारीपासून कंपनीच्या वेबसाइट आणि फ्लिपकार्टवर हा फोन विक्रिसाठी उपलब्ध होईल.
Realme P3x 5G किंमत
दुसरीकडं, Realme P3x 5G ची किंमत 6GB+128GB आणि 8GB+128GB रॅम आणि स्टोरेज कॉन्फिगरेशनसाठी 13,999 रुपये आणि 14,999 रुपये आहे. 28 फेब्रुवारी रोजी देशात Realme वेबसाइट आणि Flipkart द्वारे या फोनचा सेल सुरू होईल. हा फोन तीन रंगांमध्ये लूनर सिल्व्हर, मिडनाईट ब्लू आणि स्टेलर पिंकमध्ये खरेदी करता येईल. ग्राहकांना Realme P3 Pro 5G खरेदी करताना 2000 रुपयांची सूट आणि Realme P3x 5G वर 1,000 रुपयांची सूट निवडक कार्डवर मिळू शकते.
Realme P3 Pro 5G, Realme P3x 5G स्पेसिफिकेशन
Realme P3 Pro 5G आणि Realme P3x 5G हे दोन्ही ड्युअल सिम हँडसेट आहेत, जे Realme UI 6.0 वर चालतात. दोन्ही फोन Android 15 वर आधारित आहे. पहिला हँडसेट स्नॅपड्रॅगन 7s Gen 3 द्वारे समर्थित आहे, जो 12GB पर्यंत RAM सह येतो, तर दुसरा डायमेन्सिटी 6400 चिप आणि 8GB RAMसह येतो.