हैदराबाद : रिअलमी भारतात 'पी' लाइनअप मालिकेलाच विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनीनं या मालिकेतील एका फोनची म्हणजेच Realme P3 Pro 5G ची लाँच तारीख जाहीर केली आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून या फोनच्या लाँचिंगची चर्चा सुरू होती, पण आता कंपनीनं अधिकृतपणे या फोनच्या लाँचिंग तारखेची घोषणा केली आहे.
Realme P3 Pro च्या लाँचिंगची तारीख जाहीर
आज 6 फेब्रुवारी 2025 रोजी, कंपनीनं एक प्रेस रिलीज शेअर केली, ज्यामध्ये फोनची लाँच तारीख उघड करण्यात आली. Realme P3 Pro भारतात 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता लाँच होईल. Realme P3 Pro हा Realme च्या P मालिकेतील पहिला स्मार्टफोन असेल, तर या मालिकेत कंपनी Realme P3 5G, Realme P3x आणि Realme P3 Ultra देखील लाँच करू शकते.
चांगला जीपीयू परफॉर्मन्स
Realme च्या या फोन सिरीजमध्ये चिपसेटसाठी Snapdragon 7s Gen 3 चिपसेट वापरला जाईल. Realme P3 Pro बद्दल कंपनीचा दावा आहे की, हा या सेगमेंटमधील पहिला फोन असेल जो TSMC प्रक्रियेवर आधारित 4nm चिपसेटसह येईल. या चिपसेटबद्दल कंपनीचं म्हणणं आहे की, मागील आवृत्तीच्या चिपसेटच्या तुलनेत हा चिपसेट 20% चांगला सीपीयू आणि 40% चांगला जीपीयू परफॉर्मन्स देईल.
शक्तिशाली प्रोसेसर
Realme चा दावा आहे की हा फोन AnTuTu बेंचमार्कमध्ये 8,00,000 गुण मिळवू शकतो. यामध्ये जीटी बूस्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे, जो एआय अल्ट्रा-स्टीडी फ्रेम्स, हायपर रिस्पॉन्स इंजिन, एआय अल्ट्रा टच कंट्रोल आणि एआय मोशन कंट्रोल फीचर्स प्रदान करेल.
6000mAh बॅटरी
Realme P3 Pro 5G मध्ये क्वाड-कर्व्हड एजफ्लो डिस्प्ले असेल, जो या किंमत श्रेणीतील फोनमध्ये पहिल्यांदाच दिसेल. फोनमध्ये एरोस्पेस व्हीसी कूलिंग सिस्टम देखील देण्यात येईल. याशिवाय, फोनमध्ये 6000mAh बॅटरी दिली जाऊ शकते, जी 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येऊ शकते.
या फोनची मायक्रोसाईट फ्लिपकार्टवर लाईव्ह झाली आहे, ज्यामध्ये फोनचा हिरवा रंग दिसत आहे. सेल्फीसाठी या फोनच्या मध्यभागी पंच-होल कटआउट असेल, व्हॉल्यूम रॉकर असेल आणि उजव्या बाजूला पॉवर बटण उपलब्ध असेल. फोनच्या तळाशी टाइप-सी पोर्ट, स्पीकर व्हेंट्स आणि सिम ट्रे स्लॉट दिले जातील. याशिवाय, फोनच्या लीक झालेल्या लाईव्ह इमेजद्वारे हे उघड झाले की या फोनमध्ये एक मोठा कॅमेरा मॉड्यूल असू शकतो, ज्याचा मुख्य कॅमेरा 50MP OIS सपोर्टसह येऊ शकतो.
हे वाचलंत का :
- जगातील सर्वात पातळ फोन Oppo Find N5 फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात होणार लाँच
- आयफोन १५ बनला नंबर १, २०२४ मध्ये आयफोन १५ची सर्वाधिक विक्री, जाणून घ्या टॉप 10 सेल होणाऱ्या फोनची यादी
- iQOO Neo 10R रॅगिंग ब्लू रंगात ११ मार्चला होणार लाँच, अपेक्षित किंमत, डिझाइन, वैशिष्ट्ये जाणून घ्या...