हैदराबाद : Realme 14 Pro सीरीजच्या लॉंचची तारीख जाहीर झाली आहे. या मालिकेचं लॉन्चिंग खूप दिवसांपासून चर्चेत आहे. आता अखेर कंपनीनं सीरिजच्या लॉंचची तारीखही जाहीर केली आहे. या सीरीज अंतर्गत कंपनी दोन स्मार्टफोन आणणार आहे. यामध्ये Realme 14 Pro आणि Realme 14 Pro + यांचा समावेश असेल. कंपनीनं स्मार्टफोनची मायक्रो वेबसाईट फ्लिपकार्टवर लाईव्ह केली आहे.
Realme 14 Pro Series 5G लाँच तारीख : Realme 14 Pro Series 5G लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर उपलब्ध विक्रिसाठी असेल . कंपनीनं यासाठी फ्लिपकार्टवर वेबसाईट लाईव्हही केली आहे. कंपनीनं आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर या मालिकेच्या लॉंचची तारीख देखील जाहीर केली आहे. Reapme 14 Pro मालिका 16 जानेवारी 2025 रोजी दुपारी लॉंच होईल.
कुठं पाहता येणार लाईव्ह? :मालिकेचा शुभारंभ कंपनीच्या यूट्यूब चॅनलवर थेट पाहता येईल. या मालिकेतील दोन स्मार्टफोन फ्लिपकार्ट, रियलमी इंडियाचं ई-स्टोअर आणि ऑफलाइन स्टोअरद्वारे विकले जाईल.
फोनची विशेष वैशिष्ट्ये :हे स्मार्टफोन नॉर्डिक डिझाईन स्टुडिओ व्हॅलेर डिझायनर्सच्या सहकार्यानं बनवले आहेत. हे फोन पर्ल व्हाइट आणि स्यूडे ग्रे शेडमध्ये आणले जातील. याशिवाय, विशेषत: भारतासाठी हे फोन बिकानेर पर्पल आणि जयपूर गुलाबी रंगात आणले जातील. तसंच ते व्हेगन लेदरसह येतील.
काय असेल खास?: Realme 14 Pro सीरीजचे स्मार्टफोन ट्रिपल फ्लॅश मॅजिकग्लो सिस्टमसह येणारे जगातील पहिले स्मार्टफोन असतील. फोन क्वाड वक्र AMOLED डिस्प्ले आणि 1.5k रिझोल्यूशनसह लॉंच केले जातील. एवढंच नाही तर AI स्नॅप मोड, AI अल्ट्रा क्लॅरिटी 2.0 आणि AI HyperRAW अल्गोरिदम फीचर्स फोनवर उपलब्ध असतील. या फोनच्या किंमतीबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. लॉंच झाल्यानंतरच फोनची अधिकृत किंमत समोर येईल. नवीन पेरिस्कोपिक टेलिफोटो कॅमेरा व्यतिरिक्त, स्मार्टफोनला OIS सह 50MP Sony IMX896 प्राथमिक सेन्सर, 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि ऑटोफोकससह 32MP फ्रंट-फेसिंग कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. AI अल्ट्रा क्लॅरिटी वैशिष्ट्यासह, डिव्हाइसेसमध्ये AI-शक्तीच्या इमेजिंग सुधारणा असतील, जे कमी-रिझोल्यूशन फोटोंना उच्च-गुणवत्तेच्या प्रतिमांमध्ये वाढवू शकतात.
Realme 14 Pro मालिका 5G:अपेक्षित वैशिष्ट्ये
Realme 14 Pro Plus
डिस्प्ले: 6.74 इंच AMOLED, 1080 x 2412 रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट
प्रोसेसर: Qualcomm Snapdragon 7s Gen 3
रॅम:8GB पर्यंत
स्टोरेज: 256GB पर्यंत
मागील कॅमेरा: 50 MP मुख्य (OIS) + 50MP टेलिफोटो (OIS) + 8MP अल्ट्रा-वाइड