हैदराबाद : Realme नं भारतात त्यांची 14 Pro 5G मालिका दोन मॉडेल्ससह काल लॉंच केलीय. या मालिकेत दोन स्मार्टफोन Realme 14 Pro 5G आणि Realme 14 Pro+ 5G लॉंच झाले आहेत. हे स्मार्टफोन तीन रंगांमध्ये तुम्हाला खरेदी करता येणार आहे. यात थंड तापमानात रंग बदलणारा एक अनोखा पर्ल व्हाइट स्मार्टफोनचा देखील समावेश आहे. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये कोणते फीचर आहेत? त्यांची किंमत किती आहे? चाला जाणून घेऊया या बातमीतून ...
Realme 14 Pro+ ची वैशिष्ट्ये
- 6.83-इंच AMOLED मायक्रो-क्वाड-कर्व्हड स्क्रीन
- 1.5K (2800 x 1272p), 120Hz RR, 1500 nits कमाल ब्राइटनेस, 3840Hz PWM डिमिंग, गोरिल्ला ग्लास 7i
- स्नॅपड्रॅगन 7s Gen 3 | LPDDR4x RAM | UFS 3.1 स्टोरेज | 14GB व्हर्च्युअल रॅम
- 6,000mAh बॅटरी, 80W चार्जिंग
- फ्रंट कॅमेरा: 32 MP (GalaxyCore GC32E2)
- रिअर कॅमेरा : 50MP Sony LYT-896 OIS सह + 8MP (Sony IMX355, UW) + 50MP IMX882 OIS सह, 3x ऑप्टिकल झूम
- इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, 6000 मिमी² VC कूलिंग सिस्टम, ड्युअल स्पीकर्स, वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.2, एक्स-ॲक्सिस लिनियर मोटर
- अँड्रॉइड 15 | रियलमी UI 6.0
- 2x अँड्रॉइड ओएस अपग्रेड्स | 3वर्षांचे सुरक्षा अपडेट
- लांबी रुंदी : 163.51x 77.34x 7.99 मिमी | 194 ~ 196 ग्रॅम | IP68/69 रेटिंग