हैदराबाद :Snapdragon 8 Elite हा Qualcomm चा आत्तापर्यंतचा सर्वात वेगवान मोबाईल प्रोसेसर आहे. ही नवीन चीप तुमच्या फोनचा मेंदू आहे, जो एकाच वेळी अनेक कामं पटकन करू शकतो. तुम्ही गेम खेळत असाल, व्हिडिओ स्ट्रीमिंग करत असाल किंवा AI-चालित ॲप्स चालवत असाल. Xiaomi, Realme पासून iQOO पर्यंत अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन आता या प्रोसेसरसह लॉन्च होणार आहेत. अनेक कंपन्यांनी त्यांच्या आगामी स्मार्टफोनमध्ये ही चिप वापरणार असल्याचं म्हटलं आहे. चला, प्रोसेसरचे तपशील जाणून घेऊया.
क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट चीप :मागील चिपसेटच्या तुलनेत, कंपनीनं या चिपसेटमध्ये Qualcomm चा सेकंड जनरेशन कस्टम Qualcomm Orion CPU वापरला आहे. ज्याचा CPU स्पीड 4.32 GHz पर्यंत आहे. मागील मॉडेलच्या तुलनेत सिंगल आणि मल्टी-थ्रेडेड बेंचमार्कमध्ये CPU च्या कामगिरीमध्ये 45% सुधारणा होणार असल्याचा दावा कंपनीनं केलाय. तसंच 44% उर्जा कार्यक्षमता या चीपमुळं मिळणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. यात 4.32 GHz पर्यंत 2x प्राइम कोर आणि 3.53 GHz पर्यंत 6x परफॉर्मन्स कोर आहेत. सर्वात वेगवान LPDDR5X मेमरी 5300 MHz आहे.
नवीन AI वैशिष्ट्ये :Snapdragon 8 Elite मध्ये नवीन AI वैशिष्ट्ये आहेत. Hexagon NPU च्या अपग्रेडमुळं हा फोन तुमच्या सवयी समजू शकतो. तसंच तुम्हाला योग्य सूचना देऊ शकतो. जसं की तुम्ही ॲप्स कसं वापरवं, याची सुचाना आता चीप देऊ शकते. तुम्हाला सहजपणे काम करण्यासाठी शॉर्टकट देखील चीप सुचवू शकते. हे वैशिष्ट्य इंटरनेट कनेक्शनशिवाय देखील कार्य करतं, त्यामुळं तुमचा डेटात देखील बचत होईल.