महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

Apple नं iOS 18.2 ची पहिली बीटा आवृत्तीची घोषणा केलीय

Apple नं iOS 18.2 ची पहिली बीटा आवृत्तीची घोषणा केलीय आयफोनमध्ये ChatGPT सह नवीन AI वैशिष्ट्ये देखील तुम्हाला मिळतील.

Apple
प्रातिनिधिक छायाचित्र (Apple)

By ETV Bharat Tech Team

Published : 5 hours ago

हैदराबाद : Apple नं iOS 18.2 ची पहिली बीटा आवृत्ती जारी केली आहे. iOS 18.1 च्या रोलआउटच्या आधीच याची आवृत्ती जाहीर करण्यात आली. सुरुवातीला यूएस मधील वापरकर्त्यांना Apple इंटेलिजेंस वैशिष्ट्यचा वापर करता येणार आहे. ऍपलच्या iOS 18.2 डेव्हलपर बीटामध्ये जेनमोजीसह अनेक नवीन वैशिष्ट्ये उपलब्ध असतील, चला त्याबद्दल जाणून घेऊया...

Apple Intelligence वैशिष्ट्ये : iOS 18.2 बीटामध्ये Apple Intelligence Suite मधील अनेक अतिरिक्त वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत जी iOS 18.1 beta सह रोल आउट करण्यात आली. ज्यात Siri अपडेट्स, लेखन टूल्स, Siri साठी ChatGPAT इंटिग्रेशन, Photos मध्ये क्लीन अप, आणि मेमरीसाठी ट्रान्सक्रिप्शन सारांश समाविष्ट आहे.

प्रतिमा निर्मिती : अपडेट इमेज प्लेग्राउंड, इमेज वँड आणि जेनमोजी सारख्या वैशिष्ट्यांसह सर्जनशील प्रतिमा निर्मिती क्षमता यात मिळणार आहेत. इमेज प्लेग्राउंड वापरकर्त्यांना कार्टून-शैलीतील मजकूर प्रॉम्प्ट आणि थीमसह प्रतिमा तयार करण्यात मदत मिळणार आहे. इमेज वँड रफ स्केचेस रेंडर केलेल्या प्रतिमांमध्ये रूपांतरित करता येणार आहे. Genmoji वापरकर्त्यांना संदेशांमध्ये सामायिक करण्यासाठी वैयक्तिकृत इमोजी तयार करण्यात मदत तरणार आहे.

व्हिज्युअल इंटेलिजन्स :व्हिज्युअल इंटेलिजन्स (फक्त iPhone 16 मालिका) आयफोन 16 मालिका वापरकर्त्यांना व्हिज्युअल इंटेलिजेंसमध्ये प्रवेश मिळतो, हे असेच एक वैशिष्ट्य आहे. जे वापरकर्त्यांना लॉक स्क्रीनवरून नवीन व्ह्यूफाइंडर वापरून फोटो क्लिक करून उत्पादन किंवा ठिकाणाबद्दल अधिक जाणून घेण्यास अनुमती मिळते. विकसकांसाठी चाचणी करण्यासाठी ही वैशिष्ट्ये macOS 15.2 आणि iPadOS 18.2 च्या बीटामध्ये देखील उपलब्ध आहेत. याशिवाय, वापरकर्त्यांना Siri साठी ChatGPAT इंटिग्रेशनचे फीचर मिळणार आहे, म्हणजे जेव्हाही त्याला कोणतीही समस्या असेल तेव्हा ते OpenAI च्या चॅटबॉटची मदत घेऊ शकता.

हे वाचलंत का :

ABOUT THE AUTHOR

...view details