ETV Bharat / technology

सायबर फसवणूक प्रकणात पोलिसांना मोठं यश, 84 वर्षीय वृद्धाला 53 लाख रुपये दिले परत

cyber fraud case : हैदराबाद पोलिसांनी सायबर फसवणूक प्रकरणात 84 वर्षीय वृद्धाला 53 लाख रुपये परत केले. या वृद्धाची 2.88 कोटींची फसवणूक करण्यात आली होती.

cyber fraud case
cyber fraud case (Etv Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Oct 24, 2024, 3:39 PM IST

हैदराबाद cyber fraud case : सायबर फसवणूक प्रकरणात 2.88 कोटी रुपये गमावलेल्या एका वृद्धाला हैदराबाद पोलिसांनी 53 लाख रुपये परत केले. चुकीच्या पद्धतीनं सायबर गुन्हेगारांनी त्यांची फसवणूक केली होती. पीडितेला न्यायालयाच्या आदेशानुसार ही रक्कम परत करण्यात आली आहे. हैदराबाद येथील एका ८४ वर्षीय व्यक्तीच्या तक्रारीनंतर सिटी सायबर क्राईम पोलिसांनी तपास करून ही कारवाई केली होती.

हैदराबादचे पोलिस आयुक्त सीव्ही आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक करणाऱ्यांनी तक्रारदाराशी व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला होता. त्यांनी सीबीआय अधिकारी असल्याचं भासवून 68 कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीत त्याचा सहभाग असल्याचा दावा केला. तसंच तुम्हाला तुरुंगात जावं लागेल, अशी धमकीही दिली. यामुळं घाबरलेल्या पीडितेनं फसवणूक करणाऱ्यांच्या सूचनेनुसार त्यांनी दिलेल्या बँक खात्यात 2.88 कोटी रुपये ट्रान्सफर केले.

सायबर क्राइम पोलिसांनी आयटी कायद्याच्या कलम 66(सी), 66(डी) आणि 308(2), 318(4),319(2), 336(३), 338, 340(3) अन्वये गुन्हा दाखल केला. पोलीस अधिकाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांना नोटिसा पाठवून फसवणूक केलेली रक्कम गोठवण्यासाठी त्यांच्याकडं पाठपुरावा केला. फसवणूक झालेल्या खात्यांमध्ये असलेली रक्कम तक्रारदाराच्या बँक खात्यात परत करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

पोलीस आयुक्त म्हणाले की, कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळं न्यायालयानं बँकांना रक्कम परत करण्याचं आदेश दिले. कोर्टानं ॲक्सिस बँक, सुरतला 53 लाख रुपये आणि स्टेट बँक ऑफ इंडिया केरळला 50 लाख रुपये परत करण्याचे निर्देश दिले. बँक अधिकाऱ्यांच्या नियमित पाठपुराव्यावरून आज तक्रारदाराच्या खात्यात 53 लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

कुणाला धमकीचा कॉल आल्यास घाबरू नका, असा त्यांनी म्हटलंय. पोलीस असे कॉल करत नाहीत, हे लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. फसवणूक करणारेच असे कॉल करतात. अशा फसवणूक करणाऱ्यांना कधीही पैसे पाठवू नका, असे कॉल आल्यास हेल्पलाइन नंबर 1930 वर किंवा नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल cybercrime.gov.in वर त्वरित ऑनलाइन तक्रार नोंदवा, असं आवाहन त्यांनी लोकांना केलं.

अशा सायबर फसवणुकीबद्दल वेळोवेळी जागरूकता मिळविण्यासाठी लोकांना हैदराबाद सायबर क्राइम पोलिस स्टेशनच्या सोशल मीडिया हँडलचे नियमितपणे अनुसरण करण्याची विनंती करण्यात आली आहे. फसवणुकीची तत्काळ तक्रार केल्यास हरवलेल्या रकमेचा किमान काही भाग परतावा मिळण्याची आणि ‘पुट ऑन होल्ड’ रक्कम मिळण्याची शक्यता आहे.

हे वाचलंत का :

आता स्पॅम कॉल होणार ब्लॉक, नवीन स्पॅम ट्रॅकिंग सिस्टमची घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.