महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

PM किसानच्या 18 व्या हप्त्यासाठी तत्काळ करा ई केवायसी, कसं करायचं E KYC? - PM Kisan Samman Nidhi - PM KISAN SAMMAN NIDHI

PM Kisan Yojana 18th installment : PM किसान सन्मान निधी योजनेच्या 18 व्या हप्त्यासाठी ई केवायसी करणं गरजेचं आहे. E KYC कसं करायचं जाणून घेऊया...

Narendra Modi
नरेंद्र मोदी (Etv Bharat File Photo)

By ETV Bharat Tech Team

Published : Oct 5, 2024, 1:42 PM IST

Updated : Oct 5, 2024, 5:26 PM IST

हैदराबाद PM Kisan Yojana 18th installment: पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. 17 व्या हप्त्याची रक्कम जून महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जामा झाली होती. आता 18 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतोय. मात्र, या योजनेचा लाभ फक्त ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांनाच मिळालाय.

ई केवायसी महत्वाचीPM Kisan Yojana 18th installment: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ई केवायसी करणं आवश्यक आहे. तुम्ही ई केवायसी केलं नसेल, तर तुमच्या खात्यात 18 हप्त्याची रक्कम जमा होणार नाहीय. पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दर तीन महिण्याला सहा हजार रुपये जमा होतात.

18 वा हप्ता आज जमा होणार : शेतकऱ्यांना वर्षभरात तीन हप्ते मिळतात. शेतकऱ्यांना प्रत्येक हप्त्यात दोन हजार रुपये मिळतात. आतापर्यंत सरकारनं योजनेअंतर्गत 17 हप्ते शेतकऱ्यांना दिले आहे. आता शेतकरी योजनेचा 18 वा हप्ता खात्यात जमा झाला आहे. 12 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना 18 व्या हप्त्याचा लाभ मिळाला आहे.

ई केवायसीसाठी तीन पर्याय : पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, शेतकरी आता या तीन पर्यायांचा वापर करून त्यांचं केवायसी पूर्ण करू शकतात, जेणेकरून त्यांना पीएम किसान योजनेचा लाभ सहज मिळू शकेल.

ई केवायसी : या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई केवायसी करणं महत्वाचे आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केलंय, त्यांना पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळतोय. कारण सरकारनं ई केवायसी अनिवार्य केली आहे. शेतकरी ऑनलाइन तसंच ऑफलाइन ई केवायसी करू शकतात. जर तुम्ही अद्याप ई केवायसी केलं नसेल, तर तुम्ही तत्काळ ई केवायसी करून घ्या. ई केवायसी केल्यानंतरच तुमच्या खात्यात रक्कम जमा होईल.

असं करा ऑनलाइन ई केवायसी :

  • तुम्ही पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवर (pmkisan.gov.in) ई केवायसी करू शकता.
  • यानंतर तुम्हाला स्क्रीनवर e KYC चा पर्याय निवडावा लागेल.
  • आता एक नवीन विंडो उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल.
  • आधार क्रमांकासह नोंदणीकृत फोन नंबरवर OTP येईल.
  • OTP टाकल्यानंतर सबमिट वर क्लिक करा.
  • सबमिशन केल्यानंतर, ई केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.

हे वाचलंत का :

  1. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, PM किसान सन्मान निधीचा 18वा हप्ता खात्यावर जामा होणार - PM Kisan Samman Nidhi
  2. पंतप्रधान इंटर्नशिप योजना सुरू : 1 कोटी युवकांना रोजगाराची संधी, 'असा' करा अर्ज - Prime Minister Internship Scheme
  3. AB PM JAY योजनेत नागरिकांवर मोफत उपचार, 'असा' करा ऑनलाइन अर्ज - AB PM JAY Yojana
Last Updated : Oct 5, 2024, 5:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details