हैदराबाद :केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत 18 हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आले आहेत. सध्या शेतकरी 19 व्या हप्त्याची आतुरतेनं वाट पाहत आहेत. बऱ्याच दिवसांपासून शेतकरी पंतप्रधान किसान योजनेचा पुढच्या हप्ताची वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जामा होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 फेब्रुवारी 2025 रोजी बिहार दौऱ्यावर जाणार आहेत. त्याच दिवशी पीएम किसान सन्मान निधीचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाईल. यावेळी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपयांची रक्कम पोहोचणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अलीकडेच ही माहिती दिली. "पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार दौऱ्यावर जाणार आहेत. त्याच दिवशी किसान सन्मान निधीचा 19 वा हप्ता जारी केला जाईल", असं त्यांनी सांगितलं. या योजनेचा मुख्य उद्देश लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे आहे, जेणेकरून ते त्यांच्या शेतीच्या गरजा पूर्ण करू शकतील. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये मिळतात, जे दर 4 महिन्यांनी दिले जातात.
जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला काही नियमांचं पालन करावं लागेल. या नियमांनुसार, शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची माहिती आणि आधार कार्ड अपडेट ठेवावं लागेल. यासोबतच, जर एखाद्या शेतकऱ्याचं आधार कार्ड, बँक खात्यांशी जोडलेलं नसेल तर, त्यांनी आधार तत्काळ बॅंक खात्याशी जोडून घ्यावं.
19 व्या हप्त्याबद्दल महत्त्वाची माहिती
- या योजनेअंतर्गत साडेनऊ कोटींहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
- प्रत्येक लाभार्थ्याला 2000 रुपये मिळतील.
- एकूण वार्षिक मदत 6000 रुपये आहे, जी दर चार महिन्यांनी प्रत्येकी 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये वितरित केली जाते.
- या हप्त्यासाठी सरकारनं 20,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची तरतूद केली आहे.