महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

पेटीएमनं केलं आंतरराष्ट्रीय UPI पेमेंट लाँच, पदेशातही करता येणार कॅशलेश व्यव्हार - PAYTM INTERNATIONAL UPI PAYMENT

आता तुम्ही परदेशातही UPI पेमेंट करू शकाल. One 97 Communications Limited (OACL), या कंपनीनं पेटीएमची सुविधा आता परदेशातही सुरू केलीय आहे.

Paytm launches international UPI payments
आंतरराष्ट्रीय UPI पेमेंट लाँच (Paytm)

By ETV Bharat Tech Team

Published : Nov 21, 2024, 11:08 AM IST

हैदराबादPaytm International UPI Payment :यूपीआयच्या आगमनानंतर भारतात पेमेंट करणं अगदी सोपं झालं आहे. तुम्हाला कुणालाही पैसे पाठवायचे असतील किंवा कामगारांचं पेमेंट करायचं असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईल फोनच्या मदतीनं अगदी सहज करू शकता. भारतात डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी पेटीएमचं योगदानही खूप महत्त्वाचं आहे. आता अलीकडेच, One97 कम्युनिकेशन्स (OCL) नं संयुक्त अरब अमिराती (UAE), सिंगापूर, फ्रान्स, मॉरिशस, भूतान आणि नेपाळसह निवडक आंतरराष्ट्रीय देशात पेटीएम वापरकर्त्यांसाठी UPI पेमेंट सेवा सुरू केलीय. One97 कम्युनिकेशन्स (ओसीएल) पेटीएम ब्रँडची मूळ कंपनी आहे.

Paytm UPI पेमेंट करता येणार पदेशात :कंपनी देलेल्या माहितीनुसार, या सुविधेमुळं वापरकर्त्यांना त्यांच्या पेटीएम ॲपद्वारे UPI वापरून परदेशात पेमेंट करता येईल. कंपनीनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे की "One97 कम्युनिकेशन्स (ओसीएल), जी भारतातील आघाडीची पेमेंट आणि वित्तीय सेवा वितरण कंपनी आहे. ही कंपनी QR, साउंडबॉक्स आणि मोबाईल पेमेंट लीडर पेटीएम ब्रँडच्या मालकी आहे. त्यामुळं विदेशात देखील पेटीएम वापरकर्त्यांसाठी UPI पेमेंट सेवा सुरू केली आहे.

UPI ​वरून कॅशलेस पेमेंट :भारतीय प्रवासी आता त्यांच्या पेटीएम ॲपचा वापर करून UPI ​वरून कॅशलेस पेमेंट करू शकतात. यामध्ये संयुक्त अरब अमिराती, सिंगापूर, फ्रान्स, मॉरिशस, भूतान आणि नेपाळमधील लोकप्रिय ठिकाणांचा समावेश आहे. पेटीएमच्या प्रवक्त्यानं सांगितले की, "आगामी सुट्ट्या लक्षात घेता, आम्हाला खात्री आहे की हे पाऊल वापरकर्त्यांचा परदेश प्रवास अधिक सोयीस्कर करेल. आमचे वापरकर्ते जगात कुठेही असले तरीही त्यांना पेटीएमचा लाभ आता घेता येईल."

हे वाचलंत का :

ABOUT THE AUTHOR

...view details