हैदराबाद :आधार कार्ड धारकांसाठी एक मोठी बातमी आहे. जर तुम्ही अजून तुमचं आधार अपडेट केलं नसेल तर, तुम्हाला लवकर आधार अपडेट करण्याची गरज आहे. कारण सध्या आधार अपडेटचं काम मोफत केलं जात आहे. तुमच्याकडं मोफत सेवेचा लाभ घेण्यासाठी फक्त चार दिवसाची संधी आहे. त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी शुल्क द्यावं लागेल. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजे UIDAI नं आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत 14 डिसेंबर 2024 पर्यंत वाढवली आहे.
मुदत वाढवण्याची कमी शक्यता : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत अनेक वेळा वाढवली आहे. यामुळं आता शेवटच्या तारखेची वाट न पाहता तुम्ही तत्काळ अधार कार्ड करायला हवं. यापूर्वी 14 मार्च ते 14 जून 2024 पर्यंत तारीख वाढवण्यात आली होती. नंतर पुन्हा 14 सप्टेंबरपर्यंत तारीख वाढवण्यात आली. यानंतर, त्यात आणखी 14 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ आहे.
कसं करणार ऑनलाइन अपडेट :
- https://uidai.gov.in/ या वेबसाइटवर लॉग इन करा.
- आता होमपेजवर दिसणाऱ्या My Aadhaar पोर्टलवर जा.
- तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर मिळालेला OTP वापरून येथे लॉग इन करा.
- आता तुमचे तपशील तपासा आणि ते बरोबर असल्यास, योग्य बॉक्सवर खूण करा.
- माहिती चुकीची असल्याचं आढळल्यास, ड्रॉप-डाउन मेनूमधून ओळख दस्तऐवज निवडा.
- त्यानंतर कागदपत्र अपलोड करा.