हैदराबादOnePlus 13 :OnePlus च्या फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 13 सिरिजची प्रतीक्षा संपली आहे. OnePlus13 चीनमध्ये लॉन्च केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. हा फोन चीनमध्ये नोव्हेंबरमध्ये लॉन्च होऊ शकतो. हा स्मार्टफोन अनेक बाबतीत खास आहे. फोन Qualcomm Snapdragon 8 Elite किंवा Qualcomm 8 Gen 4 चिपसेट सह येतो. नवीन लीक झालेल्या रिपोर्टनुसार, OnePlus 13 परफॉर्मन्सच्या बाबतीत आणखी एक फ्लॅगशिप स्मार्टफोन Samsung Galaxy S25 आणि Google Pixel 9 सीरीजला मागं टाकू शकतो.
OnePlus 13 वायरलेस चार्जर : OnePlus द्वारे एक अद्वितीय चार्जर सादर केला जात आहे, ज्याद्वारे डिव्हाइस वायरलेस चार्ज केले जाऊ शकते. फोनमध्ये क्वालकॉम चिपसेट सपोर्ट दिला जाऊ शकतो. फोनमध्ये एलटीपीओ डिस्प्ले तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया..
मॅगसेफ चार्जिंग सपोर्ट उपलब्ध असेल : OnePlusचे चीनमधील अध्यक्ष लुई ली यांनी दावा केला आहे की, OnePlus 13 स्मार्टफोन मॅग्नेटिक फंक्शनसह येईल. फोन Qi2 MagSafe चार्जिंगसह ऑफर केला जाऊ शकतो. हा चार्जर iPhone 15 आणि iPhone 16 सीरीजच्या चार्जरसारखा असणार आहे. या संदर्भात अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. Qi2 चुंबकीय चार्जर 2024 मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. सध्या, हे तंत्रज्ञान सर्व iPhone 16 मालिकेतील सर्व मॉडेल्समध्ये वापरलं जातं. याशिवाय एचएमडी स्कायलाइनमध्येही हे तंत्रज्ञान वापरण्यात आलं आहे.