ETV Bharat / entertainment

35 कोटीचं बजेट.. 90 कोटींची कमाई, या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या शूटिंग सेटवर सलमान खाननं वाटल्या होत्या साड्या - SALMAN KHAN BIRTHDAY

सलमान खाननं त्याच्या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान साड्यांचं वाटप केलं होतं. हे कधी घडलं ते जाणून घ्या.

Salman Khan
सलमान खान ((Movie Poster))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : 14 hours ago

मुंबई - सलमान खान हा आजच्या काळातला एका मोठा सुपरस्टार्सपैकी एक आहे. आजही तो आपल्या लाखो चाहत्यांच्या हृदयांवर राज्य करतो. त्याच्या चाहता वर्गावरही त्याचं खूप प्रेम आहे. स्क्रिनवरील त्याची उपस्थिती आणि अभिनय यामुळं तर तो लोकांना आवडतोच पण त्याचं औदर्य आणि लोकांना मदत करण्याची वृत्ती यामुळंही तो प्रेक्षकांना आवडतो. याचं उदाहरण तेव्हा पाहायला मिळाले जेव्हा सलमान खाननं चित्रपटाच्या सेटवर काम करणाऱ्या कामगारांना 35 साड्या भेट म्हणून दिल्या होत्या. तर सांगायचं म्हणजे, उद्या म्हणजेच 27 डिसेंबरला सलमान खान त्याचा 59 वा वाढदिवस साजरा करणार आहे. याआधी आपण या साड्या वाटपाची संपूर्ण कथा जाणून घेऊ.

कोणत्या चित्रपटाच्या सेटवर हे घडलं होतं?

2009 मध्ये सलमान खान प्रभू देवाच्या 'वॉन्टेड' या अ‍ॅक्शन फिल्मचं ​​शूटिंग करत होता. दानशूरपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या सलमाननं पुन्हा एकदा आपला चांगुलपणा दाखवला. फिल्मसिटीमध्ये शूटिंगदरम्यान चार महिला सफाई कामगारांनी त्याच्याकडे साड्या मागितल्या. सलमाननं त्यांना किती महिला सफाई कामगार आहेत असं विचारले आणि लगेच एका माणसाला 35 साड्या घेण्यासाठी पाठवलं. नंतर त्यानं सर्व सफाई कामगारांना या साड्या भेट दिल्या.

हा चित्रपट ठरला होता ब्लॉकबस्टर

सलमान खानचं हे उदात्त पाऊल त्याचा दयाळू स्वभाव आणि त्याच्या हृदयाचा मोठेपणा दिसून आला. सलमान खानचा उद्या वाढदिवस आहे, आणि हा खास क्षण लक्षात ठेवल्यानं आपलं त्याच्यावरचं प्रेम आणखीनच वाढतं. 'वॉन्टेड' हा चित्रपट सलमान खानच्या करिअरच्या हिट लिस्टमध्ये सामील आहे. 35 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या 'वॉन्टेड'नं बॉक्स ऑफिसवर 90 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला होता.

कामाच्या आघाडीवर सलमान खान 2025 च्या ईदला साजिद नाडियादवाला निर्मित आणि ए.आर. मुरुगदास दिग्दर्शित 'सिकंदर' या भव्य चित्रपटासह मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. अशा परिस्थितीत सलमान खान त्याच्या 59 व्या वाढदिवसानिमित्त 'सिकंदर' या चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांना मोठी भेट देऊ शकतो. या चित्रपटाची प्रतीक्षा चाहते आतुरतेनं करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.