ETV Bharat / state

ऑक्सीटोसिन इंजेक्शन निर्मित दूध मानवी शरीराला धोकादायक? मेंदू अन् पचनक्रियेवर परिणाम - OXYTOCIN INJECTION

ऑक्सीटोसिन इंजेक्शन (Oxytocin Injection) देऊन गाई-म्हशींच्या दूध उत्पादनात वाढ करण्याच्या घटना वाढत आहेत. तर हे दूध मानवी शरीराला धोकादायक आहे का? घ्या जाणून.

Oxytocin Injection
ऑक्सीटोसिन इंजेक्शन (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 14 hours ago

मुंबई : मानवी आरोग्यास गाई-म्हशीचं दूध हे महत्त्वाचं आणि अत्यंत पोषक मानलं जातं. दुधापासून अनेक पदार्थ तयार केले जातात. दुधाला योग्य दर मिळावा यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून वारंवार मोर्चे, आंदोलने करण्यात येतात. एक-दोन रुपयांनी दूध महाग झाले तर याच्या मोठ्या प्रमाणात बातम्या केल्या जातात. परंतु जो मूळ शेतकरी आहेत, त्यांना दूध उत्पादनापासून कमीच फायदा झाल्याचं पाहायला मिळतंय.

ऑक्सीटोसिन इंजेक्शनचा अवैधपणे वापर? : गाई-म्हशींच्या दुधापासून अनेक शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चालतो. हल्ली गाई-म्हशींना ऑक्सीटोसिन इंजेक्शन (Oxytocin Injection) देऊन दूध उत्पादन वाढवले जात आहे. नुकतेच ठाण्यातील भिवंडीत ऑक्सीटोसिन इंजेक्शन आणि औषधसाठा अवैधपणे बाळगल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ऑक्सीटोसिन इंजेक्शन देऊन निर्माण केलेले दूध मानवी शरीराला धोकादायक आहे का? या इंजेक्शनच्या दुधामुळं मानवी आरोग्य धोकात आहे का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत.

ऑक्सीटोसिन दुधामुळं कोणते आजार : गाई-म्हशीचे जे नैसर्गिक दूध मानवी आरोग्यास अत्यंत पोषक आहे. या दुधामुळं लहान मुलांची शारीरिक वाढ होते. तसेच पचनक्रियेसाठी हे दूध अत्यंत चांगलं असल्याचं आरोग्य तज्ज्ञांचा दावा आहे. मात्र, या उलट ऑक्सीटोसिन इंजेक्शन देऊन निर्माण केलेले दूध हे अत्यंत घातक आणि अपायकारक आहे. परिणामी अशा दुधाच्या सेवनामुळं मानवी शरीरात विविध रोग आणि आजार होऊ शकतात. तेसच यामुळं साईड इफेक्टस दिसून येतात. या आजारांत पुरुषांना नपुसंकत्व, त्वचारोग, शोषणाचे आजार, गरोदर स्त्रींना रक्तस्त्राव, अनैसर्गिक गर्भपात, नवजात बाळाला कावीळ, दृष्टिहीनता किंवा कमी ऐकण्यास येणे, पोटाचे आजार उद्भवण्याची भीती असते. दूध उत्पादन वाढीसाठी सध्या ऑक्सीटोसिन औषध आणि इंजेक्शनचा वापर होत आहे. त्याला सरकारकडून कुठलाही परवाना किंवा मान्यता मिळाली नाही. परंतु हे गैरमार्गाने दूध उत्पादन होत असल्याची माहिती डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिलीय.

ऑक्सीटोसिनवर बंदी घालण्याचा विचार : ऑक्सीटोसिन हा मानवांमध्ये आणि प्राण्यांमध्ये उत्सर्जित होणारा महत्त्वाचा हार्मोन आहे. याचं मुख्य जे कार्य आहे ते म्हणजे गर्भवती महिला जेव्हा प्रसूती होते, तेव्हा त्या गर्भाशयाचे आकुंचन होऊन गर्भ बाहेर पडणे किंवा बाळाचा जन्म देणे. परंतु हे कार्य प्राण्यांमध्ये देखील होत असते. ऑक्सीटोसिन हार्मोन हा प्राण्यांच्या शरीरात टाकून त्यांच्या शरीरामधून दूध वाढवण्यासाठी त्याचा वापर केला जातोय. हा अंश त्यांच्या दुधामध्ये उतरतो. परंतु हे दूध अत्यंत धोकादायक आहे. ऑक्सीटोसिनवर आंतरराष्ट्रीय पातळीवर बंदी घालण्याचा विचार सुरू आहे. काही राष्ट्रात यावर बंदी आहे. या दुधाच्या सेवनामुळं मेंदू आणि पचनक्रियेवर परिणाम होतो. ऑक्सीटोसिनचे दुष्परिणाम पाहता या पद्धतीचे दूध घेणं हे आपल्याला निश्चितच धोकादायक ठरू शकते, असं आरोग्यतज्ज्ञ डॉ. अविनाश भोंडवे यांनी म्हटलंय.

प्रतिक्रिया देताना डॉ. अविनाश भोंडवे (ETV Bharat Reporter)

पोलिसांकडून कारवाई : भिवंडीमधील ऑक्सीटोसिन इंजेक्शन आणि औषधसाठा जप्त केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर आता पोलीस सतर्क झालेत. मुंबई आणि उपनगरातील गाई-म्हशींचे गोठे आणि तबेल्यांमध्ये पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, मुंबई परिसरात आणि उपनगरात म्हणजे जोगेश्वरी, गोरेगाव येथे मोठ्या प्रमाणात गाई-म्हशींचे तबेले आहेत. या तबेल्यातून दररोज हजारो लिटर दूध मुंबईकरांना पुरवले जाते. मात्र, मुंबई आणि परिसरातील या तबेल्यातून ऑक्सीटोसिन इंजेक्शन देऊन दूध उत्पादन वाढण्याचे प्रकार घडतात का? किंवा असे प्रकार समोर येतात का? याबाबत पोलीस सतर्क झाले असून, याची कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, असे प्रकार घडून येत असल्यास त्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. भिवंडीत घडलेल्या प्रकाराबाबत तिथून दोघांना अटक केली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा -

  1. बॉडी बिल्डिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची बेकायदेशीर विक्री, जिम व्यावसायिकाला अटक - Illegal Drugs Saller Arrested
  2. Bihar Crime : अनैतिक संबंधांना विरोध करणाऱ्या पत्नीला दिले हार्मोनल इंजेक्शन, 25 वर्षाच्या महिलेला पाहून नातेवाईकांना बसला धक्का
  3. Pune Crime: लैंगिक क्षमता आणि बॉडी बिल्डिंगसाठी मेफेनटरमाइन सल्फेट इंजेक्शनचा वापर, इंजेक्शनच्या 95 बॉटल्स जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.