हैदराबाद : Nvidia कंपनीनं ऍपल कंपनीला मागं टाकलं आहे. ऍपल, मायक्रोसॉफ्ट सारख्या मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांना मागं टाकून Nvidia चे शेअर बाजार मूल्य $3.53 ट्रिलियन पर्यंत पोहोचलं आहे. तर Apple शेअर सध्या $3.52 ट्रिलियन आहे असून मायक्रोसॉफ्टचे मार्केट शेअर $3.20 ट्रिलियन आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या तीन कंपन्यांमध्ये चुरशीची स्पर्धा सुरू आहे. जूनमध्येही काही दिवस Nvidia ही सर्वात मोठी कंपनी म्हणून समोल आलं होतं. पु्न्हा एकदा Nvidia नं ऍपल, मायक्रोसॉफ्ट सारख्या दिग्गज कंपन्यांना धोबी पछाडलंय.
AI चिप्सची मागणी वाढली : LSEG डेटानुसार, नवीन सुपरकंप्युटिंग एआय चिप्सच्या उच्च मागणीमुळं, कंपनीच्या शेअर्समध्ये चांगली वाढ होताना दिसत आहे. ज्याचा थेट परिणाम त्याच्या मूल्यांकनावर होत आहे. या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये Nvidia चे शेअर्स 18 टक्क्यांनी वाढले आहेत. काही दिवसांपूर्वी, ChatGPT मालकीच्या OpenAI नं देखील फंडिंगची घोषणा केली होती. ज्याचा कंपनीच्या मूल्यांकनावरही परिणाम झाला होता. Nvidia GPT 4, OpenAI चे सर्वात प्रगत फाउंडेशन मॉडेल प्रशिक्षित करण्यासाठी एक चिप तयार करत आहे.
Nvidia चे शेअर्स भविष्यातही वाढणार :एजे बेलचे गुंतवणूक संचालक, रस मोल्ड म्हणाले की, अधिकाधिक कंपन्या आता त्यांच्या दैनंदिन कामात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) स्वीकारत आहेत. त्यामुळं Nvidia चिप्सची मागणी वाढत आहे. Nvidia चे शेअर्स भविष्यातही वाढू शकतील, असं तज्ञांचं मत आहे. एआयच्या क्षेत्रात स्वत:ला प्रस्थापित करण्यासाठी मोठ्या कंपन्या AI ला प्राधान्य देत आहेत. ज्यासाठी त्यांना चिप्सची गरज आहे. याचा सर्वाधिक फायदा कंपनीला होत आहे.
Nvidia शेअर्सनं गाठला उचांक : Nvidia शेअर्सनं मंगळवारी उच्चांक गाठला. TSMC, जगातील सर्वात मोठी कॉन्ट्रॅक्ट चिप निर्माता कंपनीनं AI मध्ये वापरल्या जाणाऱ्या चिप्सच्या वाढत्या मागणीमुळं तिमाही नफ्यात अंदाजे 54% वाढ नोंदवली आहे. यानंतर शेअरमध्ये जोरदार वाढ झाली. LSEG द्वारे संकलित केलेल्या डेटानुसार, Nvidia नं ऑगस्टमध्ये तिसऱ्या तिमाहीत $32.5 अब्ज, अधिक किंवा 2% च्या कमाईचा अंदाज व्यक्त केला होता. विश्लेषक सरासरी $32.90 अब्ज कमाईची अपेक्षा करत होते.
हे वाचलंत का :
- OpenAI डिसेंबरमध्ये नवीन एआय मॉडेल 'ओरियन' लॉंच होणार नाही
- Tata Tiago EV नं 50 हजार युनिट विक्रीचा टप्पा केला पार
- SpaceX Dragon Crew 8 अंतराळवीरांसह सुरक्षितपणे पृथ्वीवर परतलं