हैदराबाद : शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागानं राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (अंडरग्रेजुएट) NEET (UG)-२०२५ नोंदणी प्रक्रियेसाठी नवीन सूचना जारी केल्या आहेत. नविन सुचनेनुसार, APAAR आयडी (ऑटोमेटेड परमनंट अकादमिक अकाउंट रजिस्ट्री) परीक्षा प्रक्रियेशी जोडण्यावर भर देण्यात आला आहे. अर्ज आणि परीक्षेच्या टप्प्यांमध्ये APAAR आयडी आणि आधार-आधारित प्रमाणीकरणाचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
एजन्सीनं म्हटलं आहे की, "नीट यूजीसाठी अर्ज करताना, विद्यार्थ्यांनी प्रमाणीकरणासाठी त्यांचे आधार कार्ड आणि अपार आयडी वापरावे. एनटीएने त्यांच्या वेबसाइट neet.nta.ac.in वर ही सूचना जारी केली आहे. एनटीए लवकरच नीट यूजी २०२५ साठी अर्ज भरण्याच्या तारखा जाहीर करेल". शिक्षण मंत्रालयाच्या सूचनांनुसार, NEET UG 2025 ला Apaar ID शी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि सत्यता सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
आधार कार्ड करा अपडेट
एनटीएनं नीट यूजीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीच्या गुणपत्रिका/प्रमाणपत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांचं आधार कार्ड अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. उमेदवाराचं नाव, जन्मतारीख आणि आधार कार्डवरील इतर माहिती दहावीच्या गुणपत्रिका/प्रमाणपत्रावर नमूद केल्याप्रमाणेच असावी. आधार कार्डला वैध मोबाईल नंबरशी लिंक करणे देखील आवश्यक आहे. जेणेकरून ओटीपी पडताळणी प्रक्रिया सहज करता येईल.
आधार कार्ड का आवश्यक आहे?
NEET UG 2025 मध्ये आधार कार्ड का आवश्यक आहे, हे NTA नं स्पष्ट केलं आहे. एजन्सीनं यासाठी पाच कारणं दिली आहेत.
सोपी अर्ज प्रक्रिया :एनटीए म्हणतं की, आधार कार्ड वापरल्यानं माहिती आपोआप भरण्यास मदत होते. त्यामुळं अर्ज करताना तुम्हाला कमी माहिती भरावी लागते.
परीक्षा प्रक्रियेत सुधारणा :आधार-आधारित तंत्रज्ञानाच्या विकासासह, उमेदवारांची ओळख UIDAI च्या फेस ऑथेंटिकेशनद्वारे जलद आणि सुरक्षितपणे पडताळली जाऊ शकते.
उपस्थिती पडताळणी :परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करताना उमेदवारांचे चेहरे त्वरित ओळखले जातात.