हैदराबाद GHOST SHARK :न्यूझीलंडच्या शास्त्रज्ञांनी शार्कच्या नवीन प्रजातीचा शोध लावला आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या समुद्रात शार्कची ही नवीन प्रजाती संशोधकांना सापडली. या शार्कला सध्या घोस्ट शार्क प्रजातीमध्ये ठेवण्यात आले आहे. घोस्ट शार्क पॅसिफिक महासागराच्या तळापासून सुमारे दीड किलोमीटर खाली पोहते.
शास्त्रज्ञांना समुद्रात सापडलं 'भूत', 8530 फूट पाण्याखाली करतं शिकार - ghost shark discovered - GHOST SHARK DISCOVERED
GHOST SHARK : न्यूझीलंडच्या शास्त्रज्ञांनी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या खोल पाण्यात राहणाऱ्या 'घोस्ट शार्क'ची नवीन प्रजाती शोधून काढली आहे.
Published : Sep 27, 2024, 3:38 PM IST
"घोस्ट शार्क" ची नवीन प्रजाती :झीलँडच्या शास्त्रज्ञांनी मंगळवारी सांगितलं की त्यांनी "घोस्ट शार्क" ची नवीन प्रजाती शोधली आहे. हा माशांचा एक प्रकार आहे, जो पॅसिफिक महासागराच्या तळाशी एक मैलांपेक्षा जास्त खोलवर शिकार करतो. वेलिंग्टनस्थित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर अँड ॲटमॉस्फेरिक रिसर्च (NIWA) च्या शास्त्रज्ञांच्या मते, ही शार्क ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या खोल पाण्यात आढळतो. वेलिंग्टनच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर अँड ॲटमॉस्फेरिक रिसर्च (NIWA) च्या शास्त्रज्ञांनी सांगितलं की भूत शार्क अत्यंत खोलीत शिकार करतात. न्यूझीलंडच्या दक्षिण बेटापासून सुमारे 1 हजार किलोमीटर दूर असलेल्या चथम राईज परिसरात शास्त्रज्ञ संशोधन करत असताना या माशाचा शोध लागला. हे क्षेत्र प्रशांत महासागरात आहे.
8530 फूट पाण्याखाली करतात शिकार : या माशाला सध्या ऑस्ट्रेलियन नॅरो-नोस्ड स्पूकफिश असं नाव देण्यात आलं आहे. शार्कमधील एक प्रजाती असल्यामुळं तिला घोस्ट शार्क म्हटलं जातंय. स्पूकफिशसारख्या घोस्ट शार्कचे डोळे भितीदायक असतात. त्याच्या त्वचेवर हलके तपकिरी गुळगुळीत स्केल असतात. ते सुमारे 2600 मीटर खोलीवर म्हणजेच 2.60 किलोमीटर म्हणजेच 8530 फूट पाण्याखाली क्रस्टेशियन जीव खातात. त्यांचं तोंड चोचीसारखे म्हणजेच टोकदार असतं. शास्त्रज्ञ ब्रिट फिनुशी यांनी सांगितलं की घोस्ट शार्क समुद्रतळाशी राहतात. त्या फार वर येत नाही.