महाराष्ट्र

maharashtra

टाटा पंच फक्त 6 लाखांमध्ये, सनरूप फिचरसह 10 प्रकारांमध्ये लाँच - Tata Punch Launched in India

By ETV Bharat Tech Team

Published : Sep 18, 2024, 10:35 AM IST

Updated : Sep 18, 2024, 5:15 PM IST

Tata Punch Launched in India : नवीन टाटा पंच भारतात लाँच झाली आहे. तिची अद्ययावत आवृत्ती 10 प्रकारांमध्ये कंपनीनं उपलब्ध करून दिलीय. नवीन Tata Punch मध्ये USB Type-C चार्जिंग पोर्ट, वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto सह नवीन 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. नवीन पंच सीएनजी ट्रिममध्ये देखील उपलब्ध आहे.

Tata Punch Launched in India
टाटा पंच (tata motors)

हैदराबाद Tata Punch Launched in India :टाटा मोटर्सनं त्यांच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या मायक्रो एसयूव्ही टाटा पंचची अद्ययावत आवृत्ती लॉन्च केली आहे. कंपनीनं तिची एक्स-शोरूम किंमत 6.12 लाख रुपये ठेवली आहे. टाटा पंच तिच्या सेगमेंटमध्ये Citroen C3 आणि Hyundai Exter सारख्या वाहनांशी स्पर्धा करेल. यामध्ये कंपनीने अनेक नवीन फीचर्स दिले आहेत. या कारमध्ये का फीचर्स दिले आहेत, ते पाहूयात...

टाटा पंच (tata motors)

नवीन टाटा पंच :नवीन टाटा पंचमध्ये आता सेंटर कन्सोलमध्ये USB टाइप-सी चार्जिंग पोर्ट, वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto सह नवीन 10.25-इंच टचस्क्रीन, इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस चार्जर, मागील AC व्हेंट्स, एक आर्मरेस्ट दिलेलं. या सर्व फिचरनंतर नवीन टाटा पंच पूर्वीपेक्षा अधिक आधुनिक आणि आरामदायक बनली आहे.

टाटा पंच (tata motors)

टाटा पंच सनरूप :टाटा मोटर्सनं नवीन टाटा पंचमध्ये अनेक नवीन फिचर दिले आहेत. नवीन पंचमध्ये सनरूफ देण्यात आलं आहे.

टाटा पंच (tata motors)

टाटा पंच 10 प्रकारांमध्ये लाँच :नवीन टाटा पंच 10 प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. Pure, Pure (ओ), Adventure, Adventure Rhythm, Adventure S, Adventure+S, ॲकम्प्लिश्ड+, ॲक्प्लिश्ड+एस, क्रिएटिव्ह+ आणि क्रिएटिव्ह+एस असे यात प्रकार दिले आहेत. कारच्या रंग पर्यायांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

टाटा पंच (tata motors)

टाटा पंच इंजिन :नवीन टाटा पंचमध्ये जुनं 1.2-लिटर, तीन-सिलेंडर, NA पेट्रोल इंजिन दिलंय. जे पाच-स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्ससह येते. याशिवाय, नवीन पंच सीएनजी ट्रिममध्ये देखील उपलब्ध आहे. जी सात वेगवेगळ्या प्रकारांमध्ये खरेदी केले जाऊ शकते.

हे वाचलंत का :

  1. स्टायलिश लुक स्मार्ट फीचर्ससह ह्युंदाई वेन्यू एडवेंचर एडिशन लाँच, इंजिनमध्ये पर्याय उपलब्ध - Hyundai Adventure Edition launched
  2. Renault Kwid, Kiger, Triber ची नाईट अँड डे एडिशन लॉन्च, फक्त 1 हजार 600 ग्राहकांना मिळणार कार - Renault edition launched
  3. महिंद्रा वीरो एलसीव्ही सेगमेंटमध्ये लॉन्च, डिझेलसह सीएनजीचा वापर, 1.55 टन लोड घेण्याची क्षमता - Mahindra Veero LCV Launched
Last Updated : Sep 18, 2024, 5:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details