मुलतान Pakistan Women vs South Africa Women 3rd T20I Live Streaming : पाकिस्तान महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांची T20 मालिका 16 सप्टेंबरपासून (सोमवार) मुलतान क्रिकेट स्टेडियम, मुलतान इथं सुरु झाली. ही 3 सामन्यांची मालिका संयुक्त अरब अमिरातीमध्ये 3 ते 20 ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या आगामी ICC महिला T20 विश्वचषक 2024 च्या संघांच्या तयारीचा भाग मानली जातेय. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज खेळवला जाणार आहे.
मालिका 1-1 नं बरोबरीत : या मालिकेतील पहिला सामना यजमान पाकिस्ताननं 13 धावांनी जिंकत मालिकेत 1-0 नं आघाडी घेतली होती. यानंतर दुसऱ्या T20 सामन्यात पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघानं 10 धांवांनी विजय मिळवत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. यानंतर आता आज होणारा तिसरा आणि शेवटच्या सामना जिंकत दोन्ही संघांचा मालिका जिंकण्याचा प्रयत्न असेल.
- पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा T20 सामना कधी आणि कुठं खेळला जाईल?
दक्षिण आफ्रिका महिला संघ विरुद्ध पाकिस्तान महिला संघ यांच्यातील तिसरा T20 सामना आज 20 सप्टेंबर रोजी होणार असून हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 10:30 वाजता सुरु होईल.
- पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा T20 सामना कुठं पाहायचा?
दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान महिला संघातील तिसरा T20 सामना भारतात प्रसारित करण्याचा अधिकार कोणालाही नाही. ज्यामुळं पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याचं प्रसारण टीव्हीवर थेट उपलब्ध होणार नाही.
- पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा T20 सामना लाईव्ह स्ट्रीम कशावर होणार?
पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या T20 सामन्याच प्रसारण टीव्हीवर थेट उपलब्ध होणार नाही. पण चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की, या रोमांचक सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर भारतात उपलब्ध असेल. जिथं चाहते सामना पाहण्याचा आनंद घेऊ शकतात.
सामन्यासाठी दोन्ही संघ :
- पाकिस्तान महिला क्रिकेट संघ : फातिमा सना (कर्णधार), आलिया रियाझ, डायना बेग, गुल फिरोजा, इरम जावेद, मुनीबा अली (यष्टिरक्षक), नशरा संधू, निदा दार, ओसामा सोहेल, सदफ शमास, सादिया इक्बाल, सिद्रा अमीन, सय्यदा आरुब शाह, तस्मिया रुबाब, तुबा हसन.
- दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ : लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), ॲनेके बॉश, तझमिन ब्रिट्स, नदिन डी क्लर्क, ॲनेरी डेर्कसेन, माईके डी रिडर (यष्टिरक्षक), अयांडा हलुबी, सिनालो जाफ्ता (यष्टिरक्षक), मारिझान कॅप, अयाबोंगा खाका, सुने लुस, नॉनकुलुलेको मलाबा, सेश्नी नायडू, तुमी सेखुखुने, चोले ट्रायॉन.
हेही वाचा :