महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

नवीन बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर 20 डिसेंबर होणार लॉंच, बॅटरीसह अधिक फीचर मिळण्याची शक्यता - BAJAJ CHETAK ELECTRIC SCOOTER

नवीन बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर लाँच 20 डिसेंबर 2024 रोजी भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. या स्कूटरमध्ये चांगल्या बॅटरीसह अधिक फीचर मिळण्याची शक्यता आहे.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)

By ETV Bharat Tech Team

Published : Dec 18, 2024, 3:21 PM IST

हैदराबाद :बजाज ऑटो लवकरच भारतात त्यांची नवीन चेतक इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याची शक्यता आहे. कंपनी त्याची चाचणी देखील करत आहे. नवीन बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर 20 डिसेंबर 2024 रोजी लाँच केली जाईल. अलीकडेच या स्कूटरची चाचणी मॉडेल दिसलं समोर आलं होतं. चाचणी दरम्यान, त्याची नवीन डिझाइन समोर आलीय. यासोबतच, हे स्कूटर नवीन रंग पर्यायांसह देखील सादर केलं जाऊ शकतं. स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि नेव्हिगेशन देखील त्यात मिळू शकतं. नवीन बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरच्या चाचणी मॉडेलमध्ये काय होत खास जाणून घेऊया...

नवीन बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर :नवीन बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अनेक बदल पाहिले जाऊ शकतात. त्यात अनेक सुधारणा केल्याचं चाचणीत दिसून आलं होतं. नवीन चेतकमध्ये फ्लोअरबोर्ड क्षेत्राखाली बॅटरीसह एक नवीन चेसिस आहे. यामुळं, त्याला पूर्वीपेक्षा जास्त बूट स्पेस मिळू शकतं. तसंच, मोठं अंडर-सीट स्टोरेज मिळू शकतं. अलीकडंच चेतकमध्ये 21 लिटर स्टोरेज क्षमता देण्यात आली आहे. मात्र, कंपनीनं याबाबत अधिकृत लॉंचची तारीख जाहीर केलेली नाहीय.

एका अहवालानुसार,लॉंच होणाऱ्या स्कूटरमध्ये ड्रम ब्रेक देखील मिळेल. तथापि, त्यात लॉक करण्यायोग्य ग्लोव्ह बॉक्स नसेल, जो सध्याच्या मॉडेलमध्ये त्याच्या फ्रंट एप्रनच्या मागे दिला जातो. त्यात कीलेस इग्निशन सिस्टम देखील नसेल.

बॅटरी आणि रेंज : नवीन बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरला नवीन बॅटरी पॅक मिळू शकते, जो संभाव्यतः त्याची रेंज वाढवू शकते. यासोबतच, स्कूटर सध्याच्या मॉडेलपेक्षा जास्त क्षमतेसह येऊ शकते. नवीन बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरमधील बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर 123 किमी ते 137 किमी दरम्यान रेंज देऊ शकते, असा दावा करण्यात येत आहे. मात्र, या दाव्याला कंपनीनं दुजोरा दिलेला नाहीय.

नवीन बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर किंमत :नवीन बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत सध्याच्यापेक्षा स्कूटरपेक्षा जास्त असू शकते. सध्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या बजाज चेतकची किंमत 95,998 रुपयांपासून सुरू होते.

हे वाचलंत का :

  1. Realme 14X 5G वॉटरप्रूफ फोन लाँच, किंमत 15 हजार रुपयांपासून सुरू
  2. POCO M7 Pro आणि POCO C75 5G लाँच, किंमत फक्त 7999 रुपये
  3. Yearender 2024: 2024 मध्ये भारतात लाँच झालेल्या टॉप टेन इलेक्ट्रिक कार

ABOUT THE AUTHOR

...view details