हैदराबाद :Flipkart च्या मालकीची फॅशन रिटेलर कंपनी Myntra नं M-Now सेवा लॉंच करण्याची घोषणा केलीय. आता ग्राहकांना त्यांची ऑर्डर ३० मिनिटांत मिळेल. फॅशन, ब्युटी ॲक्सेसरीज आणि होम आणि डेकोर श्रेणीतील 10 हजारांहून अधिक उत्पादनांसाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. येत्या तीन ते चार महिन्यांत ही सेवा 1 लाखांहून अधिक उत्पादनांना जलद ग्राहकांपर्यंत पोहचवण्याचं कंपनीचं उदिष्ट्य आहे. M Now जलद सेवा देणारी Myntra ही जगातील पहिली कंपनी बनली आहे.
मिंत्रा फ्लिपकार्ट समूहाचा एक भाग आहे. ही कंपनी अमेरिकन वॉलमार्टच्या मालकीची आहे. भारतातील फॅशन ई-कॉमर्स बाजारपेठेचा फायदा घेण्यासाठी कंपनी Amazon Fashion, Reliance Ajio आणि इतर ऑनलाइन फॅशन रिटेलर्सशी स्पर्धा करतेय. भारताचे फॅशन ई-कॉमर्स मार्केट आज 16-17 अब्ज डॉलरवर पोहचलं आहे. 2028 पर्यंत हा व्यावसाय 40-45 अब्ज डॉलरवरपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.
Myntra च्या सीईओ नंदिता सिन्हा म्हणाल्या, "ब्रँड्सच्या सहकार्यानं, M-Now सेवा फॅशनचा विस्तार करण्यासाठी परिवर्तनकारी भूमिका बजावेल. आम्ही M-Now सोबत पुढं जात असताना, Myntra अनेक विविध उत्पादनावर जलद डिलिव्हरीचा पर्याय दिला आहे.