महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

मुकेश अंबानी समर्थित स्टार्टअप भारतातील पहिला ह्युमनॉइड रोबोट लाँच करणार - HUMANOID ROBOT

मुकेश अंबानी समर्थित स्टार्टअप Adverb Technologies नं 2025 मध्ये प्रगत ह्युमनॉइड रोबोट लाँच करण्याची योजना जाहीर केली आहे. ह्युमनॉइड रोबोट एलोन मस्कच्या टेस्लाशी स्पर्धा करेल.

Mukesh Ambani
मुकेश अंबानी (Etv Bharat File Photo)

By ETV Bharat Tech Team

Published : Nov 21, 2024, 8:32 AM IST

हैदराबाद :मुकेश अंबानी समर्थित कंपनी Adverb Technologies नं 2025 मध्ये मानवासारखा आधुनिक रोबोट बनवण्याचा निर्णय घेतला आहे. हा रोबोट एलोन मस्कच्या टेस्ला कंपनीच्या रोबोट्सशी स्पर्धा करेल. नोएडामधील रोबोट बनवणारी कंपनी Adverb Technologies 2025 मध्ये रोबोट बनवणार आहे. हा रोबोट स्वतः विचार करू करून काम देखील करू शकेल.

अष्टपैलू रोबोट :हे रोबोट फॅशन, रिटेल, ऊर्जा अशा अनेक क्षेत्रात काम करण्यास सक्षम असतील. यासह, अमेरिकेच्या टेस्ला, बोस्टन डायनॅमिक्स आणि ऍजिलिटी रोबोटिक्ससारखे रोबोट्स बनवणाऱ्या जगातील देशांच्या यादीत भारताचाही समावेश होईल.

Jio 5G चा वापर :Adverb चे सह-संस्थापक आणि CEO, संगीत कुमार म्हणाले, 'आम्ही मानवासारखे रोबोट बनवण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहोत. कारण आम्हाला कंटाळवाणे, घाणेरडे आणि धोकादायक असलेली कामं दूर करायची आहेत.' कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजसोबतच्या भागीदारीचा फायदा घेईल आणि Jio चे AI प्लॅटफॉर्म आणि 5G सेवेचा वापर करेल. या रोबोट्समध्ये अत्याधुनिक GPU तंत्रज्ञान, लो-पॉवर मोटर्स आणि दोन हात असतील, ज्यामुळं ते वेगवेगळ्या भूप्रदेशांमध्ये फिरू शकतील. तसंच रोबोट गुंतागुंतीची कामं करू शकतील. या रोबोट्समध्ये व्हिज्युअल आणि लँग्वेज ॲक्शन (व्हीएलए) तंत्रज्ञान देखील असेल, ज्यामुळं ते कोणत्याही मानवी मदतीशिवाय स्वत: काम करू शकतील.

चिनी कंपन्यांशी स्पर्धा :टेस्लाच्या ऑप्टिमस रोबोटची किंमत 20 हजार ते 25 हजार डॉलरच्या दरम्यान असण्याची अपेक्षा आहे, तर Adverb चे कुमार म्हणाले की असे रोबोट तयार करण्यासाठी खूप पैसा खर्च करावा लागतो. मात्र, सरकारकडून पैसे मिळाल्यास जगभरातील, विशेषतः चीनमधील कंपन्यांशी आम्ही स्पर्धा करू. रिलायन्स, एचयूएल आणि पेप्सिको सारख्या मोठ्या कंपन्यांना सेवा देणाऱ्या अनेक लहान कंपन्यांच नेटवर्क तयार करण्याचं काम सुद्धा करतंय. भारताच्या "मेक इन इंडिया" योजनेशीहे काम सुसंगत आहे. भारतात अशा रोबोट्सची संख्या वाढवणे आणि जगभरात या तंत्रज्ञानाचा अवलंब करणं हे या कंपनीचं उद्दिष्ट आहे.

हे वाचलंत का :

  1. फक्त 8 हजार 499 रुपयात Redmi A4 5G स्मार्टफोन लॉंच
  2. 2024 मधील सर्वोत्कृष्ट ॲप्सची यादी गुगलकडून जारी, टॉप पाच मध्ये भारतीय ॲप्सचा समावेश
  3. टाटा मोटर्सच्या पहिल्या ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन ट्रकची घोषणा, सौदी अरेबियामध्ये होणार पहिला एएमटी ट्रक लाँच

ABOUT THE AUTHOR

...view details