मुंबई Motorglaze Car Care Studio :MOTORGLAZE कार केअर स्टुडिओचं चेंबूरमध्ये भव्य उद्घाटन झालं. हा नवीन स्टुडिओ कारच्या मालकांना अतुलनीय सेवा देईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या भव्य उद्घाटनाला सेलिब्रिटी अभिनेते अरुण बक्षी, संगीतकार दिलीप सेन, कॉमेडियन व्हीआयपी आणि अभिनेत्री महिमा गुप्ता यांनी विशेष उपस्थिती दर्शवली.
मोटारग्लेजची मुंबईत सेवा : मोटारग्लेज ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी समर्पित आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रिमियम इको-फ्रेंडली उत्पादनं आणि कुशल तंत्रज्ञांच्या टीमसह, Motorglaze प्रत्येक कारला अगदी नविन बनवतं, असा दावा कंपनीनं केला आहे. कंपनीची मेड इन इंडिया उत्पादनं विशेषत: भारतातील वैविध्यपूर्ण हवामान परिस्थितीनुसार तयार करण्यात आली आहेत, ज्यामुळं वाहनांची दीर्घकाळ काळजी आणि संरक्षण करता येतं.
ऑफर केलेल्या प्रीमियम सेवा :यात ग्राहकांना सर्वसमावेशक कारची साफसफाई, निर्जंतुकीकरण करून मिळणार आहे.
बाह्य तपशील :चांगल्या दर्जाचा पेंट, पॉलिशिंग, दीर्घकाळ टिकणारे फिनिशिंगसाठी संरक्षण ग्राहकांना मिळतील.
सिरॅमिक कोटिंग :पर्यावरणीय घटकांपासून कारचं संरक्षण करण्यासाठी उच्च-कार्यक्षमता संरक्षण पेंटचा वापर.