हैदराबाद MOONLESS EARTH :चंद्र हा 4.5 अब्ज वर्षांहून अधिक काळ पृथ्वीचा विश्वासू साथीदार आहे. पथ्वीवरील भरती ओहटी प्रक्रियेवर चंद्र प्रभाव टाकतो. तसंच पथ्वीवरील अक्ष स्थिर करण्यात चंद्राची महत्वाची भूमीका आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? की चंद्र अचानक गायब झाला, तर काय होईल? त्याचे पृथ्वीवर काय परिणाम होईल? याचं प्रश्नाचं उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. "चंद्रविरहित पृथ्वीचे परिणाम दूरगामी, विनाशकारी असतील," असं नेचर जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात म्हटलं आहे. "आपल्या ग्रहाचा समतोल राखण्यात चंद्राची महत्वाची भूमीका आहे", असं संशोधक डॉ. मारिया रॉड्रिग्ज यांनी संशोधनात म्हटलं आहे.
महासागरातील भरती विस्कळीत होणार : चंद्र तसंच सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणामुळं महासागराच्या पाण्याच्या पातळीत नियमित वाढ वाढ होते. यालाच आपण भरती ओहोटी असं म्हणतो. चंद्र नसन्याचा सर्वाधिक परिणाम महासागरावर होईल. ज्यामुळं किनारपट्टीची धूप, पूर समस्या निर्माण होतील. तसंच सागरी परिसंस्थांमध्ये व्यत्यय निर्माण होईल.
हवामानात बदल :चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळं पृथ्वीचा अक्ष स्थिर होण्यास मदत होते. पृथ्वी कायम 23.5 अंशांवर झुकलेली असते. चंद्र नसल्यामुळं तिचा अक्ष बदलण्याची जास्त शक्यता असते. ज्यामुळं हवामानातील अत्यंत चढ-उतार होऊ शकतात. परिणामी पृथ्वीवरील काही भाग तापमान वाढेल तसंच काही भागातील तापमानात अचानक घट होईल. त्यामुळं मोठ्या प्रमाणात सजीवसृष्टीवर परिणाम होईल.
भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक : चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव पृथ्वीच्या टेक्टोनिक प्लेट्सला स्थिर करण्यास मदत करतो. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा पृथ्वीवर प्रभावच नसेल तर, भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक वाढेल. ज्यातून व्यापक विनाश तसंच जीवितहानी होईल.