हैदराबाद Meta Facial Recognition Technology : मेटा कंपनी घोटाळ्यांचा सामना करण्यासाठी चेहरा ओळख तंत्रज्ञानाचा पुन्हा वापर करणार आहे. फेक जाहिरातींमध्ये वाढ होत असल्यानं कंपनी हे फिचर आणत आहे.
मेटा टेस्टिंग फेशियल रिकग्निशन टेक्नॉलॉजी : फेसबुक आणि इंस्टाग्रामवर "सेलेब-बेट" जाहिरात घोटाळ्यांना आता आळा बसणार आहे. कारण मेटा कंपनीनं फेशियल रिकग्निशन टेक्नॉलॉजीतंत्रज्ञाची चाचण घेण्यास सुरवात केलीय. यामुळं प्लॅटफॉर्मवर घोटाळे त्वरित ओळखता येणार आहेत.
बनावट प्रोफाइला आळा : अलीकडच्या काळात, सायबर गुन्हेगार ख्यातनाम व्यक्तींची बनावट प्रोफाइल तयार करून नागरिकांना फसवताय. लोकांना जाहिरातींमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी गुन्हेगार डीप फेकचा देखील वापर करताय. त्यामुळं नागरिकांची फसणून होत असून त्यांना आर्थिक नुकसान सोसावं लागतंय. तसंच त्यांची खाजगी माहिती, कारदपत्रांचा वापर गुन्हे करण्यासाठी वापरला जात आहे. त्यामुळंच कंपनीनं फेस ओळख तंत्रज्ञान पुन्हा आणण्याचा निर्णय घेतला आहे. कारण तीन वर्षांपूर्वी, कंपनीनं गोपनीयतेच्या पार्श्वभूमीवर फेसबुकवरील फेशियल रेकग्निशन सॉफ्टवेअर बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
“आमच्या वापरकर्त्यांचं घोटाळ्यांपासून संरक्षण करण्यासाठी FRT च्या वापराची चाचणी घेत आहोत. गोपनीयता आणि पारदर्शकतेसह, लोकांना मदत करण्यासाठी FRT हे एक शक्तिशाली साधन असू शकतं”.- डेव्हिड ॲग्रॅनोविच, मेटा.
तंत्रज्ञानाचा वापर पुन्हा सुरू : Meta येत्या काही आठवड्यांत हे तंत्रज्ञान लागू करण्याची शक्यता आहे. Meta ने 2021 मध्ये फोटो टॅगिंगसह, चेहर्यावरील ओळख तंत्रज्ञानाचा वापर बंद केला. कारण चेहर्यावरील ओळख तंत्रज्ञानासाठी नियामक लँडस्केप अजूनही विकसित होत आहे.