महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

भारतात महिंद्रा थारची 2 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री, थार रॉक्सचाही समावेश - MAHINDRA THAR SALE

महिंद्र थारची मागणी सातत्यानं वाढत असून या कारनं 2 लाखांहून अधिक युनिट्स विक्रिचा टप्पा ओलंडला आहे.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)

By ETV Bharat Tech Team

Published : Nov 19, 2024, 3:56 PM IST

हैदराबाद Mahindra Thar Total Sale : Mahindra Thar लाँच झाल्यापासून ऑक्टोबर 2024 पर्यंत, या SUV च्या एकूण 2 लाखाहून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. एवढंच नाही, तर या सेलमध्ये थार रॉक्सचाही समावेश आहे.

महिंद्रा थार विक्री : महिंद्रा थार लाँच झाल्यापासून ही एसयूव्ही भारतीय ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. या गाडीनं देशांतर्गत बाजारात 2 लाख युनिट विक्रीचा आकडा ओलांडला आहे. या सेलमध्ये नवीनतम लाँच असलेल्या थार रॉक्सचाही समावेश आहे. ऑक्टोबर 2024 अखेरपर्यंत महिंद्रा थार आणि थार रॉक्सची एकूण विक्री 2 लाख 7 हजार 110 युनिट्स झाली आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये महिंद्रा थार लाँच होऊन 4 वर्षे झाली आहेत. या सर्व वर्षांमध्ये थारनं एकूण 2 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री केली आहे.

कोणत्या आर्थिक वर्षात किती विक्री झाली? :आर्थिक वर्ष 2021 मध्ये, थारमध्ये एसयूव्हीच्या एकूण 14 हजार 186 युनिट्सची विक्री झाली. आर्थिक वर्ष 2022 मध्ये, थारला एकूण 37 हजार 844 ग्राहक मिळाले. याशिवाय 2023 मध्ये थारमध्ये एकूण 47 हजार 108 युनिटची विक्री झाली. 2024 या आर्थिक वर्षात महिंद्रा थारला एकूण 65 हजार 246 ग्राहक मिळाले, तर एप्रिल ते ऑक्टोबर 2025 या महिन्यात थार आणि थार रॉक्सला एकूण 42 हजार 726 नवीन ग्राहक मिळाले.

महिंद्रा थारची पॉवरट्रेन :महिंद्रा थारच्या पॉवरट्रेनबद्दल बोलायचं झालं तर ते तीन पॉवरट्रेन पर्यायांसह येतं. या SUV मध्ये TGDi सह 2.0-लिटर mStallion टर्बो पेट्रोल इंजिन आहे. या इंजिनमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही ट्रान्समिशन उपलब्ध आहेत. हे इंजिन 112 kW पॉवर निर्माण करतं. ही कार मॅन्युअल ट्रान्समिशनसह 300 Nm टॉर्क आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह 320 Nm टॉर्क जनरेट करते. महिंद्रा थारला 1.5-लीटर mHawk टर्बो डिझेल इंजिन देखील मिळते. हे इंजिन 87.2 kW पॉवर आणि 300 Nm टॉर्क निर्माण करते. ही SUV 2.2-लीटर mHawk टर्बो डिझेलच्या पर्यायासह देखील येते, जी 97 kW पॉवर आणि 300 Nm टॉर्क जनरेट करतं.

हे वाचंलत का :

  1. वाहन खरेदीवर टॅक्ससह नोंदणी शुल्कात 100 टक्के सूट
  2. नवीन टोयोटा कॅमरी 11 डिसेंबरला भारतात करणार एंन्ट्री
  3. दोन वर्षात 'या' एसयूव्हीनं केली रेकॉर्डतोड विक्री

ABOUT THE AUTHOR

...view details