हैदराबादMahindra stock clearance sale : तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण कार कंपन्या त्यांचा स्टॉक क्लिअर करण्यासाठी डिस्काउंट देत आहेत. महिंद्रा अँड महिंद्रा डिसेंबरमध्ये त्यांच्या बोलेरो SUV वर वर्षअखेरीची सूट देत आहे. कंपनी 2024 चा स्टॉक क्लिअर करत आहे, त्यामुळं तुम्हाला मोठी सवलत मिळू शकते. जर तुम्ही बोलेरो खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला चांगले फायदे मिळू शकतात. या तुम्हाला 1.20 लाखा सुट मिळू शकते. यामध्ये 70 हजारांची रोख ऑफर, 30 ची ॲक्सेसरीज आणि ₹20 हजारांची एक्सचेंज ऑफर मिळू शकते.
किंमत : बोलेरो निओच्या एक्स-शोरूम किंमती 11.35 लाख ते 17.60 लाख रुपयांपर्यंत आहेत. वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झाल्यास, महिंद्रा बोलेरोला ई रूफ स्की-रॅक, नवीन फॉग लाइट्स, इंटिग्रेटेड एलईडी डीआरएलसह हेडलॅम्प आणि डीप सिल्व्हर कलर स्कीममध्ये पूर्ण झालेले स्पेअर व्हील कव्हर्स यासारखे व्हिज्युअल अपग्रेड्स मिळतात.
फीचर : तुम्हाला केबिनमध्ये प्रीमियम फील देखील यात पहायाल मिळेल. या कारमध्ये ड्युअल टोन लेदर सीट्स आहेत. यात ड्रायव्हर सीटसाठी उंची तुम्ही कमी जास्त करू शकता. सेंटर कन्सोलमध्ये सिल्व्हर इन्सर्ट आहेत, तर पहिल्या आणि दुसऱ्या रांगेतील प्रवाशांसाठी आर्मरेस्ट उपलब्ध आहेत. यात 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. पण त्यात Apple CarPlay आणि Android Auto नाहीय. इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झाल्यास, कार रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, क्रूझ कंट्रोल, कनेक्टिव्हिटी ॲप आणि स्टीयरिंग-माउंट ऑडिओ कंट्रोलरसह येते. या कारमध्ये जागेची कमतरता नाही… सामान ठेवण्यासाठी एक स्मार्ट स्टोरेज स्पेस पर्याय उपलब्ध आहे. ड्रायव्हरच्या सीटच्या खाली एक अंडर-सीट स्टोरेज ट्रे देखील प्रदान केला आहे.