Mukhyamantri Annapurna Yojana : विद्यमान अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा' योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब कुटूंबांना मोफत गॅस सिलिंडर मिळणार. ज्यांच्याकडं स्वतःचा गॅस नाही, अशा नागरिकांना मदत करण्यासाठी सरकानं ही योजना आणली आहे. तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा का?, यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज कसा करावा लागेल? पात्रतेच्या अटी काय आहेत? जाणून घेऊया या बातमीतून...
तीन मोफत गॅस सिलिंडर मिळणार :महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 ही केवळ राज्यस्तरीय योजना आहे. सरकारनं ST, SC, EWS उमेदवारांसाठी ही योजना सुरू केलीय. या योजनेंतर्गत गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना दरवर्षी तीन मोफत गॅस सिलिंडर मिळणार. देशभरात गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, हे आपणा सर्वांना माहीत आहे. त्यामुळं राज्य सरकार गरीब जनतेला मदत करण्यासाठी मोफत गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्याचं काम करत आहे.
या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरीब लोकांपर्यंत गॅस सिलिंडर पोहोचवणं आहे. यासोबतच प्रत्येक वर्षी एका कुटुंबाला मोफत एलपीजी गॅस सिलिंडर मिळणार आहे. त्यामुळं तुम्ही जर महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही पात्रता निकषांचं पालन करून या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.
पात्रता निकष
- अर्जदार हा मूळचा महाराष्ट्राचा असणं आवश्यक आहे.
- अर्जदार हा SC, SC, EWS श्रेणीतील असावा.
- लाभार्थी कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा.
- अर्जदाराच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं.
- केवळ पाच सदस्य असलेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येईल.
- योजनेशी संबंधित आवश्यक कागदपत्रं असावीत.