महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

Lava Blaze Duo 5G भारतात लॉंच, जाणून घ्या एका क्लिकवर सर्व माहिती - LAVA BLAZE DUO 5G LAUNCH

Lava Blaze Duo 5G स्मार्टफोन भारतात लॉंच झाला आहे. हा फोन ड्युअल डिस्प्लेसह येतो. फोनमध्ये 64MP कॅमेरा सारखी मजबूत फीचर आहेत.

Lava Blaze Duo 5G
लावा ब्लेझ ड्युओ 5जी (Lava)

By ETV Bharat Tech Team

Published : Dec 16, 2024, 1:47 PM IST

हैदराबाद : ऑक्टोबरमध्ये अग्नि 3 लाँच केल्यानंतर लावानं Lava Blaze Duo 5G स्मार्टफोन भारतात लॉंच केलाय. हा कंपनीचा ब्लेझ मालिकेतील ड्युअल डिस्प्ले असलेला नवीनतम 5जी स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह 6.67 इंच FHD+ 3D वक्र AMOLED डिस्प्ले आहे.

सेकंडरी AMOLED रियर स्क्रीन :फोनमध्ये सेकंडरी AMOLED रियर स्क्रीन आहे. ज्याला इन्स्टास्क्रीन असंही म्हणतात. हा इन्स्टास्क्रीन तुम्हाला कॉल्स, संदेश, सेल्फी, रियर कॅमेरा, म्युझिक प्लेअर, स्टेप्स, कॅलरी ट्रॅकर, व्हॉइस रेकॉर्डर, टाइमर, स्टॉपवॉचसह वेदर सारख्या अनेक उपयुक्त दैनंदिन ॲप्स वापरण्यास अनुमती देतं.

64 एमपी रियर कॅमेरा :हा फोन MediaTek Dimensity 7025 SoC ला समर्थन करतो. यामध्ये तुम्हाला 8 जीबीपर्यंत रॅम + 8 जीबी व्हर्च्युअल रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मिळेल. त्यात सोनी सेन्सरसह 64 एमपी रियर कॅमेरा असून 2 एमपी सेकंडरी कॅमेरा आहे. हा फोन कोणत्याही ब्लोटवेअरशिवाय अँड्रॉइड 14 वर चालतो. कंपनीनं अँड्रॉइड 15 अपडेट लवकरच उपलब्ध होईल असं आश्वासन दिलं आहे. यात 33 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली 5000 एमएएच बॅटरी आहे.

लावा ब्लेझ ड्युओ 5जी स्पेसिफिकेशन :

  • 6.67-इंच (1080x 2400 पिक्सेल) 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह FHD+ ३D वक्र AMOLED स्क्रीन
  • 1.58" (228x 460 पिक्सेल) सेकंडरी AMOLED स्क्रीन.
  • ऑक्टा कोर (2 x 2.5 GHz कॉर्टेक्स-A78+ 6x 2GHz कॉर्टेक्स-A55 CPUs) IMG BXM-8-256 GPU सह मीडियाटेक डायमेन्सिटी 7025 6nm प्रोसेसर.
  • 6GB / 8GB LPDDR 5रॅम, 128 GB UFS 3.1 स्टोरेज.
  • ड्युअल सिम. (नॅनो + नॅनो)
  • अँड्रॉइड 14.
  • सोनी सेन्सरसह 64 MP मुख्य कॅमेरा, f/2.4 अपर्चरसह 2MP सेकंडरी मॅक्रो कॅमेरा, LED फ्लॅश.
  • 16 MP फ्रंट-फेसिंग कॅमेरा.
  • इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर.
  • USB टाइप-सी ऑडिओ, स्टीरिओ स्पीकर्स, डॉल्बी अ‍ॅटमॉस.
  • धूळ आणि पाणी प्रतिरोधक. (IP64)
  • लांबीसह रुंदी : 162.4 ×73.85×8.45मिमी.
  • वजन : 186 ग्रॅम.
  • 33W जलद चार्जिंगसह 5000mAh बॅटरी.

किंमत आणि उपलब्धता :लावा ब्लेझ ड्युओ 5G सेलेस्टिअल ब्लू आणि आर्कटिक व्हाइट रंगांमध्ये येतो. हा फोन 6GB + 128GB मॉडेलची किंमत 16,999 रुपये आहे. तसंच 8GB + 1228 GB मॉडेलची किंमत 17,999 रुपये आहे. हा फोन Amazon वर उपलब्ध होईल. 20 डिसेंबरपासून या फोनचा सेल सुरू होत आहे.

हे वाचलंत का :

  1. इलेक्ट्रिक दुचाकी विक्रीनं ओलांडला 10 लाख युनिटचा टप्पा, वाचा कोण आहे एक नंबर?
  2. Moto G35 5G चा पहिला सेल आज, 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत घरबसल्या करा ऑर्डर
  3. Apple iPhone 17 पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये लाँच होण्याची शक्यता, काय असतील बदल?

ABOUT THE AUTHOR

...view details