हैदराबाद Kia Syros :दक्षिण कोरियाची कार कंपनी Kia भारतीय बाजारात नवी कार सादर करणार आहे. Kia ची नवीन कार, Syros, 1 फेब्रुवारी रोजी लॉंच होण्यासाठी सज्ज आहे. या कारसाठी आज, शुक्रवार, 3 जानेवारी रोजी बुकिंग सुरू झालं आहे. ही कार खरेदी करण्यासाठी, बुकिंग रक्कम म्हणून 25 हजार रुपये जमा करावं लागणार आहेत. त्याच वेळी, ही कार आजपासून Kia डीलरशिपपर्यंत पोहोचेल.
किंमत कधी उघड होईल? : Kia Syros लाँच झाल्यानंतर या नवीन कारची किंमत देखील समोर येईल. ऑटोमेकर्सनी अद्याप याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही, पण ही किया कार 10 लाख रुपयांच्या रेंजमध्ये आणली जाऊ शकते. Kia Sonet च्या तुलनेत ही कार सुमारे एक लाख रुपयांनी महाग होऊ शकते. कंपनी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात या कारची डिलिव्हरी सुरू करू शकते. Kia Syros 17 जानेवारीला इंडिया मोबिलिटी शोमध्ये देखील सादर केली जाऊ शकते.
किआ सिरोसची शक्ती :Kia Syros दोन इंजिन पर्याय आणि 6 ट्रिमसह बाजारात येणार आहे. या वाहनाला 1.0-लिटर टर्बोचार्ज केलेले पेट्रोल इंजिन मिळेल, जे या वाहनाला 120 hp ची शक्ती देईल आणि 172 Nm टॉर्क जनरेट करेल. ही Kia कार डिझेल इंजिनच्या पर्यायासह देखील येणार आहे. या कारमध्ये 1.5-लिटर डिझेल इंजिन असेल, जे 116 एचपी पॉवर आणि 250 एनएम टॉर्क देईल.