हैदराबाद :लक्झरी कार निर्माता कंपनी जग्वारनं आपल्या नवीन ब्रँडचा लोगो जाहीर केला आहे. कंपनी 2026 पासून फक्त EV ब्रँडमध्ये रूपांतरित होणार आहे. नवीन ब्रँड ओळखीसह, एक नवीन लोगो देखील लॉंच करण्यात आला, जो जग्वारच्या आगामी इलेक्ट्रिक जीटी संकल्पनेवर आधारित असेल. जग्वार सध्या F-Pace चं उत्पादन थांबवत आहे. F-Pace या वर्षाच्या शेवटी जागतिक बाजारपेठेत विक्रीसाठी गेलेलं त्याचं शेवटचं मॉडेल आहे.
नवीन ब्रँड ओळखीबद्दल बोलताना, जग्वारनं एका निवेदनात म्हटलं की, "आमच्या नवीन ब्रँडला "उत्साही आधुनिकतावाद" असं नाव दिलंय. आकर्षक डिझाइन ब्रॅंडकडं कोणाचंही लक्ष वेधून घेतोय." ब्रँडचे मुख्य क्रिएटिव्ह ऑफिसर गेरी मॅकगव्हर्न म्हणाले की "नवीन ब्रँड जग्वारचे संस्थापक सर विल्यम लायन्स यांच्या विचाराचं अनुसरण करतो."
जॅग्वार नवीन लोगो :जॅग्वारनं आपल्या नवीन लोगोचं यावेळी सादरीकरण केलंय. ज्यामध्ये नवीन ‘डिव्हाइस मार्क’ आणि ‘लीपर’ मेकर मार्कचा समावेश आहे. नवीन डिव्हाइस मार्क स्वच्छ आणि साध्या फॉन्टमध्ये “जॅग्वार” सादर करण्यात आलाय. तर मेकर मार्कमध्ये क्लासिक लीपर लोगोची नवीन आवृत्ती आहे. मोनोग्राम लोगोची जागा आता वर्तुळाकार लोगोनं घेतली आहे ज्यामध्ये दोन 'J' अक्षरे एकमेकांच्या विरुद्ध कोनात दिसताय. 2 डिसेंबर 2024 रोजी मियामी आर्ट वीक येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात जग्वारच्या नवीन ब्रँड ओळखीचे सादरीकरण केलं जाईल. ही संकल्पना कार जग्वारच्या आगामी सर्व-इलेक्ट्रिक लाइन-अपमधील पहिली मॉडेल असेल, जी 2026 मध्ये लॉंच होईल.
हे वाचलंत का :
- व्होल्वो कंपनीनं केली नवीन इलेक्ट्रिक कार लाँच, 'या' मॅडेलवर 5.05 लाख रुपयांची सूट
- टाटा मोटर्सच्या पहिल्या ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन ट्रकची घोषणा, सौदी अरेबियामध्ये होणार पहिला एएमटी ट्रक लाँच
- भारतात महिंद्रा थारची 2 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री, थार रॉक्सचाही समावेश