हैदराबाद : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि आयआयटी-मद्रास यांनी संयुक्तपणे शक्ती तंत्रज्ञानावर आधारित स्वदेशी अर्धसंवाहक (सेमीकंडक्टर) चिप विकसित केलीय. त्याला 'इंडिजिनस RISCV कंट्रोलर फॉर स्पेस अॅप्लिकेशन्स' (IRIS) असं नाव देण्यात आलं आहे. ही चिप अंतराळात वापरल्या जाणाऱ्या प्रणाली आणि उपकरणांसाठी बनवली आहे. ही चिप चंदीगड येथील सेमीकंडक्टर प्रयोगशाळेत तिरुवनंतपुरम येथील इस्रो इनर्शियल सिस्टम्स युनिटच्या सहकार्यानं तयार करण्यात आली. ही चीप कर्नाटकातील टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्समध्ये पॅक करण्यात आलीय.
अंतराळ मोहिमांना प्रगती
आयआरआयएस चिपचा वापर आयओटी, संगणक प्रणाली आणि अंतराळ मोहिमांमध्ये केला जाऊ शकतो. यामध्ये शक्ती प्रोसेसर वापरण्यात आलं आहे. चिपची कार्यक्षमता वाढविण्यासाठी अॅडव्हान्स्ड सिरीयल बस, कॉर्डिक आणि वॉचडॉग टाइमर सारखे मॉड्यूल यात जोडले आहेत. भविष्यातील अंतराळ मोहिमांमध्ये त्याला अधिक चांगला वापर होणार आहे. एससीएल चंदीगड येथे आम्ही विकसित केलेली ही तिसरी शक्ती चिप आहे. चिप डिझाइन, फॅब्रिकेशन, पॅकेजिंग, मदरबोर्ड डिझाइन, चिप असेंब्ली आणि बूटिंग हे सर्व भारतात केलं जातं.
चिपशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी