बेंगळुरू :ईटीव्ही भारतच्या अनुभा जैन यांनी इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांची विशेष मुलाखत घेतलीय. यावेळी नारायणन यांनी अनेक मोहिमांवर भाष्य केलंय. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) पुढील दशकासाठी मोठ्या योजना आखात आहेत. ज्यामध्ये एक नवीन प्रणोदन प्रणाली, 200 टन वजनाचे थ्रस्ट इंजिन, व्हीनस मिशन, मार्स ऑर्बिटल मिशन, चंद्रयान-4 आणि चंद्रयान 5 मोहिमेचा समावेश आहे. यावेळी बोलताना नारायणन यांनी गगनयान मानवी अंतराळ उड्डाण मोहिमेबद्दल सविस्तरपणे माहिती दिलीय. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी या महिन्याच्या सुरुवातीला गगनयान मोहीम 2026 मध्ये सुरू होणार असल्याचं म्हटलं होतं.
या प्रकल्पातील पहिलं मानवाविरहित मिशन व्योमित्र रोबोट घेऊन अंतराळात जाणार आहे. भारतीय अंतराळ संस्था क्रूड मिशनपूर्वी एकूण तीन अनक्रूड चाचणी उड्डाणे प्रक्षेपित करेल. या वर्षी श्रीहरिकोटा येथून पहिलं उड्डाण प्रक्षेपित होणार आहे. "यशस्वी चाचणीनंतर, क्रूड मिशननंतर सुरू होईल. मोहिमेसाठी निवडलेल्या अंतराळवीरांना मिशनची तयारी सुनिश्चित करण्यासाठी कठोर शारीरिक आणि प्रशिक्षण मॉड्यूलमधून जावं लागेल, असं इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी ईटीव्ही भारतला सांगितलं.
"गगनयान मिशनचं उद्दिष्ट 400 किमी लो अर्थ ऑर्बिट (LEO) मध्ये तीन अंतराळवीरांना पाठवणं आहे. यात मानवी-रेटेड LVM 3 यानाचा (HLVM 3) वापर होणार आहे. हे वाहन स्ट्रक्चरल आणि थर्मल मार्जिनसह सुसज्ज असेल. रिअल-टाइम व्हेईकल हेल्थ मॉनिटरिंग सिस्टम, क्रू सुरक्षेसाठी ऑर्बिटल मॉड्यूल सिस्टम आणि प्रगत पर्यावरण नियंत्रण आणि सुरक्षा प्रणाली समाविष्ट यात असेल. जेव्हा उच्च वेग असलेली एखादी वस्तू पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करते, तेव्हा ती लक्षणीय उष्णता निर्माण करते. यावर उपाय म्हणून, इस्रो सुरक्षित पुनर्प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी प्रगत थर्मल प्रोटेक्शन सिस्टम विकसित करत आहे. अंतिम टप्प्यात, पॅराशूट वापरून अंतराळयानचा वेग नियंत्रित केलं जाईल, ज्यामुळे सुरक्षित आणि अचूक लँडिंग होईल", असं नारायणन यांनी सांगितलं.
"गगनयान कार्यक्रमानंतर, इस्रो चंद्र ध्रुवीय अन्वेषण मोहीमेस (LUPEX) सुरवात करणार आहे. या मोहिमांना आधीच मान्यता मिळाली आहे. त्यामुळं या मोहिमा इस्रोसाठी प्रमुख केंद्रबिंदू आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जपानी एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी (JAXA) च्या सहकार्यानं विकसित केला जात आहे, जो चंद्राच्या संशोधनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल असेल," असं नारायणन म्हणाले.
हे वाचलंत का :
- JNU के आठवें दीक्षांत समारोह में 2721 छात्र छात्राओं को प्रदान की गईं डिग्रियां, 798 पीएचडी डिग्री शामिल
- 2027 में लॉन्च होगा चंद्रयान-4, केंद्रीय मंत्री ने दी जानकारी, गगनयान और समुद्रयान के बारे में भी बताया
- ISRO, DRDO से नौकरी का प्रस्ताव ठुकराया, अब मिला धांसू जॉब ऑफर, जानें सैलरी