हैदराबाद:इंस्टाग्राम ॲपवरून तुम्हाला आता स्पॉटिफाईच्या लायब्ररीत पोस्टमध्ये ऐकलेले गाणं जोडता (Add) येणार आहे. Instagram नं Spotify सह भागीदारी केली आहे. या दोन्ही प्लॅटफॉर्ममधील भागीदारीचा उद्देश दोन्ही प्लॅटफॉर्मच्या वापरकर्त्यांना त्यांचं आवडतं गाणं जतन करण्याची प्रक्रिया सोपी करणं आहे. इंस्टाग्रामनं एक्सवर एक पोस्ट शेअर करून याची घोषणा केली आहे. आता सर्व इंस्टाग्राम वापरकर्ते स्पॉटिफाई लायब्ररीमध्ये विविध पोस्टमध्ये शोधत असलेली गाणी जतन करण्यास सक्षम असतील. चला, हे फीचर कसं वापरायचं ते जाणून घेऊया.
Instagram चं नवीन फिचर : तुम्ही इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये ऐकलेल्या कोणत्याही गाण्यावर टॅप करता, तेव्हा ते गाणं किंवा संगीत वापरून इतर पोस्ट दर्शविणाऱ्या पृष्ठावर तुम्हाला जावं लागतं. याव्यतिरिक्त, याच पृष्ठावर ऑडिओ वापरा बटण देखील दिसतं, जे वापरकर्त्यांना त्यांच्या पोस्टमध्ये गाणं वापरण्याची परवानगी देतं. आता, त्यांना यूज ऑडिओ बटणाच्या खाली आणखी एक लहान बटण दिसेल, जे त्यांना इन्स्टाग्रामवरून स्पॉटिफाई लायब्ररीमध्ये गाणं जोडता येणार आहे.
Spotify लायब्ररीमध्ये जोडा : हे गाणं ॲपच्या 'लाइक गाणी' प्लेलिस्ट आणि 'Your Library' टॅबमध्ये सेव्ह केलं जाईल. तथापि, Instagram वरून ऐकलेलं गाणं थेट Spotify लायब्ररीमध्ये जोडण्यासाठी, Instagram वापरकर्त्यांनी प्रथम त्यांचं Instagram खातं त्यांच्या Spotify खात्याशी लिंक करणं आवश्यक आहे. इंस्टाग्राम खातं स्पॉटिफायशी लिंक कसं करायचं? ते जाणून घेऊया...