ऋषिकेशSpring-assisted cranioplasty surgery :AIIMS ऋषिकेश आरोग्य सुविधाच्या बाबतीत सतत नवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. नुकतीच एका नवजात बाळाच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करण्यात AIIMS ऋषिकेशला यश आलं आहे. या बाळाचं डोकं गोलाकार नसून आकारहीन होतं. हा मुलगा हरिद्वारचा रहिवासी आहे. त्यांचा जन्मही एम्स ऋषिकेशमध्ये झाला होता.
बाळाचं डोकं झालं सरळ : एम्स ऋषिकेशच्या रिकन्स्ट्रक्शन विभागा तसंच न्यूरो सर्जरी ऍनेस्थेशिया विभागाच्या टीम वर्कमुळं हा चमत्कार घडला आहे. साधारणपणे ही शस्त्रक्रिया फक्त किमान ४ महिने वयाच्या बाळांवरच केली जाते. पण दीड महिन्याच्या बाळाच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करून त्याच्या चुकीच्या डोक्याला सामान्य आकार देण्याची ही वैद्यकशास्त्राच्या इतिहासातली बहुदा पहिलीच घटना आहे. वैद्यकीय क्षेत्रात या तंत्राला स्प्रिंग असिस्टेड क्रॅनियोप्लास्टी असं म्हटलं जातं.
क्रॅनियल स्प्रिंग सर्जरी :बर्न्स तसंच प्लास्टिक मेडिसिन विभागाचे सर्जन डॉ. देबब्रती चट्टोपाध्याय यांनी सांगितलं, स्प्रिंग असिस्टेड क्रॅनिओप्लास्टी सर्जरी बाळाच्या डोक्याचा असामान्य अरुंद, लांब, तिरकस आकार दुरुस्त करण्यासाठी केली जाते. मेंदूचं नुकसान होण्यापासून तसंच बाळाचं अविकसित डोकं दुरुस्त करण्यासाठी ही प्रक्रिया विशेषतः प्रभावी आहे.
अन्यथा मेंदूच्या विकासात अडचण : न्यूरो सर्जरी विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. रजनीश अरोरा यांनी सांगितलं, ''या मुलाच्या डोक्याचा आकार खूपच लहान होता. जर ही शस्त्रक्रिया झाली नसती, तर त्याचं डोक्याची तसंच मेंदू वाढ होऊ शकली नसती. या शस्त्रक्रियेमुळं आपला मेंदू स्थित असलेल्या डोक्याच्या (क्रॅनिअम) भागावरही परिणाम होतो. त्यामुळं ही शस्त्रक्रिया अत्यंत संवेदनशील, जोखमीची होती." वैद्यकीय अधीक्षक प्रा. संजीव कुमार मित्तल यांनी तंत्रज्ञानावर आधारित शस्त्रक्रियेच्या क्षेत्रातील हा एक मैलाचा दगड असल्याचं वर्णन केलंय. शस्त्रक्रियेत सहभागी असलेल्या डॉक्टरांच्या टीमचं त्यांनी कौतुक केलंय.
स्प्रिंग्स असिस्टेड क्रायोनोप्लास्टी म्हणजे काय? : बर्न तसंच प्लास्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. विशाल मागो सांगतात की, नवजात बाळांसाठी डोक्यावर शस्त्रक्रिया करण्याची ही एक प्रक्रिया आहे. ज्यामध्ये कवटीचे अंतर रुंद करण्यासाठी डोक्यात छोटे चीरे करून तिथं स्टेनलेस स्टीलचे स्प्रिंग्स बसवले जातात. जेणेकरून मेंदूला वाढण्यास जागा मिळेल. काही महिन्यांनंतर तिथं नवीन हाड तयार होतं. त्यामुळं बाळाच्या डोक्याला नवीन आकार प्राप्त होतो.
AIIMS डॉक्टर प्रशंसनीय कार्य करत आहेत :प्लास्टिक सर्जरी, न्यूरोसर्जरी, ऍनेस्थेसिया, बालरोग तज्ञांच्या एकत्रित टीमच्या नेतृत्वाखाली, AIIMS ऋषिकेशनं स्प्रिंग असिस्टेड क्रॅनिओप्लास्टी तंत्रज्ञानाचा वापर करुन यशस्वी सर्जरी केली आहे. AIIMS संस्थेचं उद्दिष्ट लोकांमध्ये दुर्मिळ आजारांबद्दल जागरूकता निर्माण करणं, उपचारांमध्ये नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर करणं, डॉक्टरांचे कौशल्य, अनुभव सामायिक कारणं आहे. याचा फायदा देशभरातील रुग्णांना होणार आहे.
हे वाचलंत का :
- ऑटिझमने प्रभावित असलेल्या प्रसिद्ध व्यक्तींबद्दल जाणून घ्या... - World Autism Awareness Day 2024
- अपराजिता फुलाचे आयुर्वेदात विषेश महत्त्व, जाणून घ्या फायदे - Aprajita flower
- लहान मुलांमध्येही वाढतोय मूळव्याध; काय आहेत कारणं, वेळीच घ्या काळजी अन्यथा होऊ शकतो धोका - Increase piles In Children