दिल्ली India first air train :दिल्ली विमानतळ ऑपरेटर DIAL टर्मिनल 1 आणि इतर दोन टर्मिनल्स दरम्यान कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी एअर ट्रेन सुरू करण्याची योजना आखत आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (IGIA) हे देशातील सर्वात व्यस्त विमानतळ आहे. इथं तीन टर्मिनल आहेत. डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर मॉडेलवर आधारित "एलिव्हेटेड आणि एट-ग्रेड ऑटोमेटेड पीपल मूव्हर (APM) सिस्टम" लागू करण्याचं DIAL चं उद्दिष्ट आहे. एपीएम किंवा एअर ट्रेनसाठी निविदा यापूर्वीच जारी करण्यात आल्या आहेत.
कार्बन उत्सर्जन कमी होणार : एपीएम प्रणाली टर्मिनल 1 आणि टर्मिनल 2 आणि 3 दरम्यान जलद आणि अखंड कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी डिझाइन केलेली आहे. ज्यामध्ये एरोसिटी आणि कार्गो सिटी मार्गे अंदाजे 7.7 किमी लांबीचा मार्ग समाविष्ट आहे. त्यामुळं कार्बन उत्सर्जन देखील कमी होणार आहे. सध्या दिल्ली विमानतळावर एका टर्मिनलवरून दुसऱ्या टर्मिनलवर जाण्यासाठी डीटीसी बसनं प्रवास करावा लागतो. त्यामुळं बराच वेळ जातो. मात्र आता हवाई रेल्वे धावल्यानं हा प्रवास काही मिनिटांतच पूर्ण होणार आहे.
प्रकल्पासाठी निविदा जारी :DIAL नं या प्रकल्पासाठी निविदा जारी केली असून ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत बोली सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. एअर ट्रेनचे 4 थांबे असतील. ही ट्रेन जगातील अनेक देशांतील विमानतळांवर हवाई सेवा देत आहे. आता भारतातही त्याची सुरुवात होणार आहे. विमानतळाच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचा खर्च विमान कंपन्यांकडून आकारण्यात येणाऱ्या लँडिंग आणि पार्किंग शुल्कातून वसूल केला जातो.
एअर ट्रेन म्हणजे काय? :हवाई ट्रेन सामान्यतः जगभरातील प्रवाशांसाठी विनामूल्य असतात. या ट्रेन फक्त टर्मिनल दरम्यान धावतात. एअर ट्रेन, ज्याला ऑटोमेटेड पीपल मूव्हर (APM) देखील म्हटलं जातं. ही एक स्वयंचलित ट्रेन प्रणाली आहे, ज्याचा उपयोग विविध टर्मिनल आणि विमानतळावरील इतर महत्त्वाच्या स्थानांना जोडण्यासाठी केला जातो. ही मोनोरेल म्हणून देखील काम करते. या ट्रेन प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक आंतरराष्ट्रीय विमानतळांवर चालतात. प्रवाशांची एका टर्मिनलवरून दुसऱ्या टर्मिनलवर जलद आणि सोयीस्कर पद्धतीनं वाहतूक करणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे.
एअर ट्रेनची गरज काय? : दिल्ली विमानतळ हे भारतातील सर्वात व्यस्त विमानतळ आहे आणि दरवर्षी 7 कोटींहून अधिक प्रवासी त्यातून प्रवास करतात. येत्या ६-८ वर्षांत ही संख्या दुप्पट होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत टर्मिनल्समधील उत्तम कनेक्टिव्हिटी खूप महत्त्वाची आहे. टर्मिनल 1 हे टर्मिनल 2 आणि 3 पासून काही अंतरावर स्थित आहे. सध्या, प्रवासी टर्मिनल दरम्यान बसनं प्रवास करतात. त्यामुळं बराच वेळ लागतो. हा वेळ वाचवण्यासाठी हवाई ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.