हैदराबाद : Hyundai ची 5-सीटर टक्सन देशातील सर्वात सुरक्षित कारच्या यादीत सामील झाली आहे. या SUV नं इंडिया NCAP क्रॅश चाचणीमध्ये 5 स्टार सुरक्षा रेटिंग प्राप्त केलं आहे. Hyundai Venue ला ग्लोबल NCAP च्या क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार मिळाल्यानंतर टक्सन हे HMIL च्या पोर्टफोलिओमध्ये 5 स्टार मिळवणारं दुसरं वाहन ठरलं आहे. India NCAP द्वारे चाचणी केलेली Hyundai Tucson हे 2.0-लिटर पेट्रोल AT Signature मॉडेल, 1828 kg च्या कर्ब वजनासह 2-रो 5-सीटर SUV आहे. या SUV ला प्रौढ आणि मुलांसाठी 5-स्टार स्कोअर मिळाले आहेत.
प्रवाशांसाठी 3-पॉइंट सीटबेल्ट :Hyundai Tucson च्या चाचणी केलेल्या मॉडेलमध्ये सुरक्षेसाठी फ्रंट, साइड आणि पडद्याच्या एअरबॅग्ज तसंच सीटबेल्ट रिमाइंडरसह सर्व प्रवाशांसाठी 3-पॉइंट सीटबेल्ट समाविष्ट आहेत. सीटबेल्ट प्री-टेन्शनर आणि लोड लिमिटर देखील मानक सुरक्षा किटचा भाग होते. टक्सनमध्ये चाइल्ड सीट इन्स्टॉलेशनसाठी आउटबोर्ड सीट्सवर ISOFIX चाइल्ड सीट माउंट्स देखील आहेत.
Hyundai Tucson ची भारत NCAP मध्ये कामगिरी :India NCAP नं घेतलेल्या सुरक्षा चाचणीत, Hyundai Tucson नं प्रौढ प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी 32 गुणांपैकी 30.84 गुण मिळवले. टक्सनला फ्रंटल ऑफसेट डिफॉर्मेबल बॅरियर चाचणीसाठी 16 पैकी 14.84 गुण आणि साइड मूव्हेबल डिफॉर्मेबल बॅरियर चाचणीसाठी 16 पैकी 16 गुण मिळाले. अशा प्रकारे, 30.84 गुणांसह, टक्सननं प्रौढ प्रवाशांच्या सुरक्षिततेमध्ये 5 स्टरा मिळवले.