हैदराबाद Maharashtra Assembly elections: तुम्ही मतदार यादीत तुमचं नाव तपासण्यासाठी अनेक पद्धती वापरू शकता. ज्यात ऑनलाइन पोर्टल, एसएमएस सेवा, मोबाइल ॲप, हेल्पलाइन नंबरचा समावेश आहे. या पद्धतींद्वारे तुम्ही तुमचं नाव मतदार यादीत आहे की, नाही याची खात्री सहज करू शकता, जेणेकरून तुम्ही कोणत्याही त्रासाशिवाय मतदान करता येईल.
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान :केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तसंच झारखंडमध्ये 13 आणि 20 नोव्हेंबरला दोन टप्प्यात निवडणुका पार पडणार आहे. महाराष्ट्रातील एकूण 288 जागांवर निवडणूक विधानसभेची निवडणूक होणार असून झारखंडमध्ये 81 जागांवर निवडणूक पार पडेल. त्यामुळं तुम्हाला देखील या निवडणुकीत मतदान करायचं असेल, तर तुमच्याकडं मतदान कार्ड असणं गरजेचं आहे. मात्र, तुमचं नाव आगोदच मतदार यादीत असल्यासं ते ऑनलाईन कसं पहावं याबद्दल आज आपण जाणून घेऊया...
ऑनलाइन :National Voter Service Portal Elections24.eci.gov.in वर जाऊन तुम्ही ऑनलाइन मतदार यादीत तुमचं नाव तपासू शकता. यासाठी “मतदार यादीत आपलं नाव शोधा” वर क्लिक करा. येथे तुम्हाला तीन पर्याय मिळतील.
EPIC क्रमांकानुसार शोधा :EPIC क्रमांक प्रविष्ट करा, जो तुमचा मतदार आयडी क्रमांक आहे.
वर्णनानुसार शोधा : तुमचं नाव, लिंग आणि जन्मतारीख प्रविष्ट करा आणि शोधा.