हैदराबाद How to Apply Voter ID Card : महाराष्ट्रातील 288 जागांवर निवडणूक होणार असून 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तुम्ही या महाराष्ट्रात मतदान करणार असाल तर तुमच्याकडं मतदान कार्ड असणं आवश्यक आहे. जर तुमचं मतदार कार्ड हरवलं असेल, किंवा तुम्हाला नवीन मतदार कार्ड काढायचं असेल, तर तुम्ही या सहजपणे मतदार कार्ड काढू शकता. ते कंस काढायचं जाणून घेऊया..
मतदार कार्ड पात्रता : भारतात मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्र आवश्यक आहे. याला इलेक्टोरल फोटो आयडेंटिटी कार्ड असंही म्हणतात. पण हे कार्ड हरवल्यावर काय करायचं? नवीन मतदार कार्ड कसं मिळवायचं? मतदार ओळखपत्रासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा, कोणती पात्रता आवश्यक आहे?, चला समजून घेऊ.
मतदार ओळखपत्रासाठी ऑनलाइन अर्ज : भारतासह अनेक देशांना लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी मतदार ओळखपत्र आवश्यक आहे. हे ओळखीचा पुरावा म्हणून देखील मानलं जातं. तसंच, मतदानाचा हक्क बजावण्यासाठी हे कार्ड आवश्यक आहे. त्यामुळं तुमच्याकडं मतदार ओळखपत्र नसल्यास, तुम्ही मतदार ओळखपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. ऑनलाइन मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी झाली आहे. आज आम्ही तुम्हाला मतदार ओळखपत्रासाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा याची सर्व माहिती देणार आहोत.
मतदार ओळखपत्र म्हणजे काय : भारतात प्रत्येकाला एकदाच मतदान करण्याचा अधिकार आहे. यासाठी मतदारांना निवडणूक आयोगाकडून (EPIC) मतदार ओळखपत्र दिलं जातं. हे कार्ड देण्याचा अधिकार फक्त निवडणूक आयोगाला आहे. निवडणुकीत मतदान करण्यासाठी हे कार्ड महत्त्वाचं असतं. त्यात तुमची ओळख आणि पत्ता देखील असतो. केवळ पात्र नागरिकच मतदान करू शकतील याची खात्री करण्यासाठी हे कार्ड निवडणूक प्रक्रियेदरम्यान वापरलं जातं. तसंच, हे कार्ड इतर सरकारी योजनासाठी वापरलं जाऊ शकतं.
पात्रता निकष : मतदार ओळखपत्र अर्ज प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी, तुम्ही खालील निकष पूर्ण करत असल्याची खात्री करा.
नागरिकत्व : तुम्ही देशाचं नागरिक असणे आवश्यक आहे.
वय : साधारणपणे, निवडणुकीच्या तारखेला किंवा त्यापूर्वी तुमचं वय किमान १८ वर्षे पूर्ण असावं.
रहिवाशी :तुम्ही मतदानासाठी भारताचे रहिवाशी असणं गरजेचं आहे.
ऑनलाइन अर्ज : मतदार ओळखपत्रासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया वापरकर्त्यासाठी सोपी करण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी खालील माहितीचं अनुसरण करा.
1. आयोगाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या :
भारतात, तुम्ही भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) अधिकृत वेबसाइट https://eci.gov.in किंवा तुमच्या संबंधित राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) च्या वेबसाइटला भेट द्यावी.
2. नोंदणी/लॉग इन :तुम्ही नवीन वापरकर्ता असल्यास, तुम्हाला पोर्टलवर खातं तयार करून नोंदणी करणं आवश्यक आहे. त्यासाठी, तुम्हाला तुमची माहिती जसं की नाव, ईमेल पत्ता आणि मोबाइल नंबर प्रदान करणं आवश्यक आहे. तुम्ही आधीच नोंदणीकृत असल्यास, फक्त लॉग इन करा.
3. अर्जाचा प्रकार निवडा : नवीन मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करण्यासाठी किंवा विद्यमान मतदान कार्ड अपडेट करण्यासाठी पर्याय निवडा. प्रथमच मतदार ओळखपत्रासाठी नवीन कार्डचा पर्याय निवडा.