महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

दिल्लीत प्रदूषणाची पातळी गंभीर : शाळा हायब्रिड पद्धतीनं सुरू, GRAP 4 अंतर्गत निर्बंध, काय असेल बंद? - DELHI GRAP 4

दिल्लीमधील प्रदूषणाची पातळी गंभीर झाली आहे. प्रदूषणाची पातळीही वेगानं वाढल्यामुळं सरकारला GRAP 4 अंतर्गत निर्बंध लादावं लागले आहेत.

delhi air pollution
दिल्ली प्रदूषण (ANI)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 17, 2024, 10:46 AM IST

हैदराबाद : देशाची राजधानी दिल्लीची हवा पुन्हा एकदा विषारी झाली आहे. सोमवारी रात्री 9 वाजता दिल्लीचा AQI 399 नोंदवण्यात आला. त्यानंतर रात्री 10 वाजता तो 400 च्या पुढे गेला. ही एक प्रदूषणाची गंभीर पातळी मानली जाते. दरम्यान, प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी, CPCB आणि पर्यावरण मंत्रालयानं स्थापन केलेल्या CAQM नं तातडीची बैठक बोलावलीय. या बैठकीत CAQM नं संपूर्ण दिल्ली-NCR मध्ये ग्रेप 4 प्रतिबंध (grap 4) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणून, आजपासून (17 डिसेंबर 2024) ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन (GRAP) चा चौथा टप्पा लागू करण्यात आला आहे. यापूर्वी, GRAP चा तिसरा टप्पा 16 डिसेंबर 2024 रोजी दुपारी लागू करण्यात आला होता. या अंतर्गत अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत.

बांधकामवर बंदी :ग्रेप 4 अंतर्गत, महामार्ग आणि उड्डाणपूल यांसारख्या सार्वजनिक प्रकल्पांसह सर्व प्रकारच्या बांधकामवर बंदी असेल. यासोबतच दिल्लीत अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. ग्रुप 4 अंतर्गत, दिल्ली एनसीआरमध्ये 9वी आणि 11वी पर्यंतचे वर्ग आता हायब्रिड मोडमध्ये चालतील. म्हणजेच शाळा ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने चालतील. शाळा फक्त इयत्ता 10वी आणि 12वी साठी निर्णय घेऊ शकता. ग्रुप 3 मध्ये पाचव्या वर्गापर्यंत हायब्रीड मोड आधीच लागू करण्यात आला होता.

जाणून घ्या दिल्लीच्या कोणत्या भागात किती AQI ?: यापूर्वी सोमवारी (16 डिसेंबर) केंद्रानं स्थापन केलेल्या समितीनं दिल्ली-एनसीआरमधील हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी ग्रेप 3 लागू केला होता. दिल्लीचा 24 तासांचा सरासरी AQI, दुपारी 4 वाजता येथे नोंदवला गेला, तो सोमवारी 379 नोंदवला गेला. यानंतर ते वाढतच गेला आणि रात्री दहा वाजता तो 400 पर्यंत वाढला. यानंतर ग्रेप 4 ची अंमलबजावणी करावी लागली. रोहिणीमध्ये 451, पंजाबी बागेत 447, वजीरपूरमध्ये 446, विवेक विहारमध्ये 446 आणि नेहरू नगरमध्ये AQI 441 नोंदवला गेला. त्याचप्रमाणे, आयटीओमध्ये 425, मंदिर मार्गावर 412 आणि मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये 411 एक्यूआय नोंदवला गेला.

शाळा हायब्रिड पद्धतीनं सुरू : दिल्ली-एनसीआरमध्ये वर्ग हायब्रिड पद्धतीनं चालवले जातील. GRAP स्टेज -4 अंतर्गत दिल्ली आणि एनसीआरमधील वायू प्रदूषणाची धोकादायक पातळी लक्षात घेता, शांळासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वं जारी करण्यात आली आहेत. दिल्ली, गुरुग्राम, फरिदाबाद, गाझियाबाद आणि नोएडा येथे सहावी ते नववी आणि अकरावीचे वर्ग आता हायब्रीड पद्धतीनं घेण्यात येतील. हायब्रीड मोड म्हणजे विद्यार्थी भौतिक आणि ऑनलाइन मोड दोन्ही पर्याय वापरू शकतात. मुलांच्या आरोग्याच्या सुरक्षेला प्राधान्य देत हे पाऊल उचलण्यात आलं आहे. वायू प्रदूषणामुळं, शाळांमध्ये शारीरिक उपस्थिती आवश्यक नाही. तुम्ही ऑनलाइन क्लासेस देखील उपस्थित राहू शकता. या निर्णयाचे पालन करण्याचे निर्देश शासनानं सर्व शाळांना दिले आहेत.

हे वाचलंत का :

  1. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) बंपर भरती, 'इथं' करा थेट ऑनलाइन अर्ज
  2. प्रधानमंत्री आवास योजननेचा लाभ घेण्याची सुवर्णसंधी, योजनेअंतर्गत मिळणार 1 कोटी नवीन घरं, 'असा' करा अर्ज
  3. CISF फायरमन प्रवेशपत्र जारी : 'इथं' करा थेट डाउनलोड

ABOUT THE AUTHOR

...view details