महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

भारतीय गुगल क्रोम वापरकर्त्यांना सरकाचा इशारा, Google Chrome अत्ताच अपडेट करा अन्यथा... - GOOGLE CHROME HIGH ALERT

Google Chrome High Alert : CERT-In नं भारतीय गुगल क्रोम वापरकर्त्यांसाठी इशारा जारी केला आहे. काय आहे इशारा जाणून घ्या...

Google Chrome High Alert
गुगल क्रोम (Etv Bharat File Photo)

By ETV Bharat Tech Team

Published : 5 hours ago

हैदराबादGoogle Chrome High Alert : भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथकानं Indian Computer Emergency Response Team (CERT-In) भारतातील गुगल क्रोम वापरकर्त्यांसाठी उच्च-तीव्रतेचा इशारा जारी केला आहे.

ब्राउझरच्या डेस्कटॉप त्रुटी : ब्राउझरच्या डेस्कटॉप आवृत्तीमध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत, ज्यामुळे वापरकर्त्यांच्या डेटा आणि सिस्टम स्थिरतेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या त्रुटी सायबर गुन्हेगाराना तुमच्या सिस्टमचा गैरफायदा घेण्यास, तुमचं डिव्हाइस क्रॅश करण्यास अनुमती देऊ शकतात. 131.0.6778.139 आणि 131.0.6778.108 पूर्वी रिलीज झालेल्या विंडोज, मॅकओएस आणि लिनक्ससाठी क्रोमच्या आवृत्त्यांवर गंभीर धोका असल्याचं सरकानं म्हटलं आहे. जर तुम्ही तुमचा ब्राउझर अपडेट केला नसेल, तर तुमचं डिव्हाइस सुरक्षित करण्याची वेळ आली आहे.

काय आहे धोका ? :सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या ब्राउझरपैकी एक असलेल्या गुगल क्रोममध्ये गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. यामध्ये ब्राउझरच्या V8 इंजिनमधील "टाइप कन्फ्यूजन" आणि त्याच्या ट्रान्सलेट फीचरमधील "युज आफ्टर फ्री" यांचा समावेश आहे. वेब हॅकर वापरकर्त्यांना वेब पेजेसना भेट देण्यास भाग पाडून या समस्यांचा फायदा घेऊ शकतात. एकदा फायदा घेतल्यानंतर हॅकर हानिकारक कोड कार्यान्वित करू शकतात.

कोण होणार प्रभावित ? :विंडोज, मॅकओएस किंवा लिनक्स - Google Chrome च्या जुन्या आवृत्त्या वापरणाऱ्या वापरकर्त्यांना यापासून धोका आहे. 131.0.6778.139 किंवा 131.0.6778.108 पूर्वीच्या ब्राउझर आवृत्त्या असलेले लोक सहजपणे हॅकर्सचे लक्ष्य बनू शकतात.

संरक्षित कसं राहायचे? :CERT-In नं सर्व वापरकर्त्यांना त्यांचं ब्राउझर लवकरात लवकर अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. ही समस्या दूर करण्यासाठी Google नं आधीच एक पॅच जारी केला आहे.

Google Chrome अपडेट कसं करणार? :

  • Google Chrome उघडा, वरच्या उजव्या कोपऱ्यात नेव्हिगेट करा आणि मेनूवर (तीन उभ्या ठिपके) क्लिक करा.
  • मदत निवडा, नंतर Chrome बद्दल निवडा.
  • ब्राउझर अपडेट्स तपासा आणि अपडेट करा.
  • ब्राउझर अपडेट्स झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा लॉंच करा निवडा.

हे वाचलंत का :

  1. OnePlus 13, OnePlus 13R प्रतिक्षा संपली, 'या' तारखेला करणार धमाका
  2. Realme 14X 5G वॉटरप्रूफ फोन लाँच, किंमत 15 हजार रुपयांपासून सुरू
  3. POCO M7 Pro आणि POCO C75 5G लाँच, किंमत फक्त 7999 रुपये

ABOUT THE AUTHOR

...view details