महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

घरबसल्या 10 मिनिटांत काढा मोफत ई पॅन कार्ड, जाणून घ्या काय आहे प्रक्रिया - E Pan Card - E PAN CARD

E Pan Card : ई पॅन कार्ड प्राप्तिकर विभागाकडून दिलं जातं. हा महत्त्वाचा दस्तऐवज तुम्ही काही मिनिटांत घरी बसून काढू शकता. तेही अगदी मोफत. चला तर मग जाणून घेऊया ई-पॅन कार्ड मिळविण्याची काय आहे प्रक्रिया.

E Pan Card
प्रातिनिधिक छायाचित्र (Etv Bharat File Photo)

By ETV Bharat Tech Team

Published : Sep 5, 2024, 3:27 PM IST

हैदराबादE Pan Card :देशात आयकर भरण्यासाठी आयकर विभागाकडून 10 अंकी पॅन कार्ड दिलं जातं. या कार्डमध्ये प्रत्येक करदात्यानं केलेल्या व्यवहारांचा आढावा घेतला जातो. कोणत्याही व्यक्तीनं त्याच्या बँक खात्यात आर्थिक व्यवहार केल्यास हा व्यवहार PAN द्वारे ट्रॅक केला जाऊ शकतो. साधारणपणे, छपाई, टपाल आणि मॅन्युअल पद्धतीमुळं प्रत्यक्ष पॅन कार्ड मिळण्यास थोडा वेळ लागतो. मात्र, आता ई-पॅन जनरेट करण्याची सुविधा उपलब्ध आहे. आम्ही तुम्हाला काही मिनिटांत ई-पॅन कार्ड कसं मिळवायचं याबद्दल माहिती सांगतोय. तुम्ही या माहितीचा उपयोग करून ई-पॅन कार्ड काढू शकता.

काय आहे ई-पॅन सुविधा ? :ज्या अर्जदारांकडे वैध आधार क्रमांक आहे, त्यांना ई-पॅन कार्ड झटपट दिले जातात. ई-पॅन सर्व वापरकर्त्यांना पीडीएफ स्वरूपात जारी केलं जातं. ते पूर्णपणे विनामूल्य आहे. ई-पॅन हे डिजिटल स्वाक्षरी केलेलं कार्ड आहे, जे आधारच्या ई-केवायसीवर आधारित इलेक्ट्रॉनिक स्वरूपात दिलं जातं. ही सुविधा सर्व करदात्यांना उपलब्ध आहे. जर कोणाकडं फिजिकल पॅनकार्ड नसेल, पण आधार असेल तर ते ई-पॅन काढू शकतात. या सेवेद्वारे, वापरकर्ते कोणतेही पैसे न भरता आधार आणि मोबाइल नंबरच्या मदतीनं इलेक्ट्रॉनिक स्वरूपात डिजिटल स्वाक्षरी असलेलं पॅन कार्ड मिळवू शकतात. याशिवाय, तुम्ही तुमच्या आधार ई-केवायसीनुसार पॅन तपशील देखील अपडेट करू शकता. नंतर ई-फायलिंग पोर्टलवर ई-पॅन डाउनलोड करू शकता.

काय आहेत ई-पॅनचे फायदे? : ई-पॅन ही एक सोपी आणि पेपरलेस प्रक्रिया आहे. यासाठी फक्त आधार तसंच त्याच्याशी मोबाईल नंबर लिकं केलेला असावा. ई-पॅन सर्व प्रकारच्या कामांसाठी स्वीकारलं जातं.

ई-पॅन त्वरित कसं मिळवायचं : सर्वप्रथम तुम्हाला इन्कम टॅक्सच्या अधिकृत वेबसाइट https://www.incometax.gov.in/iec/foportal/ वर जावं लागेल. यानंतर ई-फायलिंग पोर्टलच्या होमपेजवर क्लिक करा, त्यानंतर झटपट ई-पॅनवर क्लिक करा. आता ई-पॅन पेजवर Get New e-PAN वर क्लिक करा. येथे तुम्हाला आणखी एक नवीन ई-पॅन पेज मिळेल, जिथे तुम्हाला 12 अंकी आधार क्रमांक टाकावा लागेल. यानंतर आय कन्फर्म चेकबॉक्स निवडा आणि Continue वर क्लिक करा. यानंतर संमती अटीवर क्लिक करा. तुम्हाला तुमच्या आधारशी लिंक केलेल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला 6 अंकी OTP प्रविष्ट करावा लागेल. यानंतर, UIDAI सोबत आधार तपशील प्रमाणित करण्यासाठी चेकबॉक्स निवडा आणि नंतर Continue वर क्लिक करा. आता Validate Aadhaar Details पेजवर क्लिक करा आणि I Accept चेकबॉक्सवर टिक मार्क करा आणि नंतर Continue वर क्लिक करा. सबमिशन केल्यानंतर, तुमच्यासमोर पोचपावती क्रमांकासह एक संदेश दिसेल. त्यानंतर तुमला ई-पॅन कार्ड तयार झालेलं दिसेल.

हे वाचलंत का :

  1. फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल 'या' तारखेपासून सुरू, 80% पर्यंत मिळणार सूट - Flipkart Big Billion Days 2024
  2. वीज बिल जास्त येतयं? आता काळजी कशाला करता, 'या' टिप्स फॉलो करून करा विजेसह पैशाची बचत - Save money save electricity
  3. घरी एलपीजी गॅसवर स्वयंपाक करता? स्वयंपाक करताना पाळा 'हे' महत्त्वाचे नियम - LPG gas

ABOUT THE AUTHOR

...view details