हैदराबाद Tata Plantla Fire :शनिवारी 28 सप्टेंबर 2024 तामिळनाडूच्या होसूर येथील टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या उत्पादन युनिटमध्ये भीषण आग लागली. प्राथमिक अहवालानुसार, सेलफोन उत्पादन विभागात आग लागल्याची माहिती आहे. मॅन्युफॅक्चरिंग युनिटमधील कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.
मालमत्तेचं नुकसान :आगीत मोठ्या प्रमाणात मालमत्तेचं नुकसान झालं असून सध्या अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. दुसरीकडं, स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, नागमंगलमजवळ उदनापल्ली येथे असलेल्या कंपनीच्या मोबाईल फोन ॲक्सेसरीज पेंटिंग युनिटमध्ये पहाटे साडेपाच वाजता आग लागली. काही वेळातच आग संपूर्ण परिसरात पसरू लागली. सर्वत्र धूर दिसू लागला. त्यामुळं कर्मचारी स्थानिक नागरिकांमध्ये घबराट पसरली.
आगीच्या कारणाचा तपास सुरू :आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या पथकानं सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढलं. आतापर्यंत कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही. आग लागली तेव्हा पहिल्या शिफ्टमध्ये सुमारे 1 हजार 500 कर्मचारी ड्युटीवर होते, असं वृत्त आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड (TEPL) च्या प्रवक्त्यानंही या अपघाताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, सर्व कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आपत्कालीन प्रोटोकॉलचं पालन केलं गेलंय. सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. आगीच्या कारणाचा तपास सुरू आहे.
तीन जणांना श्वसनाचा त्रास : त्याच वेळी, स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, बाहेर काढण्यात आलेल्या लोकांमध्ये तीन जणांना श्वसनाचा त्रास होतो. अशा स्थितीत तिघांनाही खासगी रुग्णालयात नेण्यात आलं, तिथं त्यांची प्रकृती स्थिर आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, परिस्थिती हाताळण्यासाठी 100 हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सर्व कर्मचाऱ्यांनी परिसर रिकामा केलाय.
हे वाचलंत का :
- तुमचा मोबाईल फोन स्लो चार्ज होतोय?, बॅटरी बॅकअप कमी होण्याचं कारण काय? - Why Mobile Phone Charging Slowly
- कामगारांशी थेट चर्चा करण्यास तयार सॅमसंगची तयारी, तिसऱ्या आठवड्यात देखील संप सुरू - Samsung Workers Strike
- आता वीज बिलापासून मिळवा मुक्ती : नागरिकांना मिळतेय मोफत वीज, घरबसल्या इथं करा अर्ज - PM SURYA GHAR MUFT BIJLI YOJANA