महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

3 महिन्यांसाठी मोफत इंटरनेट, 18 OTT प्लॅटफॉर्मचं सबस्क्रिप्शन, रिचार्ज दर ऐकून व्हाल थक्क - 3 months free internet - 3 MONTHS FREE INTERNET

Excitel 3 Months Free Internet : इतर कंपन्याचे रिचार्ज दर वाढलेले असताना तुम्हाला कोणी तीन महिने मोफत इंटरनेट देणार असेल तर त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र, एक कंपनी ग्राहकांना मोफत इंटरनेट देत आहे. या व्यतिरिक्त ग्राहकांना 18 OTT सबस्क्रिप्शन देखील मिळत आहे. काय आहे या कंपनीचे दर? कसा मिळणार तुम्हाला फायदा चला जाणून घेऊया...

Excitel 3 Months Free Internet
Excitel 3 महिने मोफत इंटरनेट (Etv Bharat MH Desk)

By ETV Bharat Tech Team

Published : Oct 1, 2024, 1:14 PM IST

हैदराबाद Excitel 3 Months Free Internet :भारतातील आघाडीच्या ब्रॉडबँड कंपन्या Reliance Jio आणि Airtel सारख्या कंपन्याचे रिचार्ज दर वाढले आहेत. त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला झळ पोहचत आहे. मात्र, तुम्ही देखील स्वस्त रिचार्जच्या सोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण मार्केटमध्ये एक नविन कंपनी दाखल झाली आहे.

रिचार्ज दर कमी :या कंपनीचे रिचार्ज दर कमी असल्यानं ग्राहकांना अधिक फायदा होत आहे. या कंपनीचं नाव Excitel असून कंपनीनं ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत, कंपनी 3 महिन्यांसाठी मोफत इंटरनेट तसंच 18 प्रकारचे OTT (Netflix, Amazon Prime इ.) चं सबस्क्रिप्शन देत आहे. या ऑफर अंतर्गत, कंपनी ग्राहकांना आकर्षित करत आहे. कंपनीनं चांगल्या दर्जाचं इंटरनेट देण्याचं आश्वासन दिलं आहे. चला, या ऑफरबद्दल जाणून घेऊया...

Excitel रिचार्ज प्लॅन (Excitel)

Excitel चा नवीन प्लॅन :Excitel कंपनीची नवीन रिचार्ज ऑफर 499 रुपये प्रति महिना आहे. जर तुम्ही 9 महिने कंपनीचं इंटरनेट वापरलं तर, तुम्हाला 3 महिने इंटरनेट मोफत मिळणार आहे. तसंच तुम्हाला 18 OTT प्लॅटफॉर्म आणि 150 हून अधिक चॅनेल पाहायला मिळतील. ही ऑफर सक्रिय आहे.

Excitel रिचार्ज प्लॅन (Excitel)

18 OTT प्लॅटफॉर्मचा लाभ :या ऑफरमध्ये तुम्हाला Amazon Prime, Disney + Hotstar, Sony Liv, Altbalaji आणि इतर अनेक सारख्या 18 OTT प्लॅटफॉर्मचा लाभ मिळतोय. या ऑफर अंतर्गत, कंपनी ग्राहकांना आकर्षित करत आहे. चांगल्या दर्जाचं इंटरनेट देण्याचं आश्वासन कंपनी देत आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला मोफत लाइव्ह टीव्ही चॅनेल आणि मोफत स्मार्ट टीव्ही किंवा एचडी प्रोजेक्टर देखील मिळेल. कंपनीची ही ऑफर 35 हून अधिक शहरांमध्ये उपलब्ध आहे.

दोन नवीन प्लॅन लाँच :Excitel नं या महिन्याच्या सुरुवातीला बिग स्क्रीन प्लॅन नावाच्या दोन नवीन ब्रॉडबँड योजना लाँच केल्या होत्या. या प्लॅनची ​​किंमत 1 हजार 299 रुपये आणि 1 हजार 499 रुपये आहे. या योजनांमध्ये, वापरकर्त्यांना हाय-स्पीड इंटरनेट, OTT सबस्क्रिप्शन, मोफत लाइव्ह टीव्ही चॅनेल आणि मोफत स्मार्ट टीव्ही किंवा HD प्रोजेक्टर मिळेल. कंपनीची ही ऑफर 35 हून अधिक शहरांमध्ये उपलब्ध आहे.

'हे' वाचलंत का :

  1. AI वैशिष्ट्यांसह सॅमसंगचे दोन टॅबलेट लॉन्च, जाणून घ्या किंमत... - Samsung Galaxy Tablets
  2. मराठीसह बंगाली, तेलगू, पंजाबी भाषेत वापरता येणार लिंक्डइननं - LinkedIn adds 10 new language
  3. ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह Samsung Galaxy S24 EF लाँच, जाणून घ्या खास फिचर - SAMSUNG GALAXY S24 EF LAUNCHED

ABOUT THE AUTHOR

...view details