मुंबई Deep Fake eKYC Solution Launch :नाविन्यपूर्ण बँकिंग तंत्रज्ञानात pi-labs.ai एक अग्रगण्य AI-आधारित डीपफेक डिटेक्शन स्टार्टअप आहे. फिनाकस सोल्युशन्स आणि pi-labs.ai यांनी संयुक्तपणे जगातील पहिले डीप eKYC सोल्यूशन लॉन्च केले आहे. हे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान डीपफेक डिटेक्शन AI-चालित घोटाळ्यांपासून संरक्षण प्रदान करतं. कारण काही दिवसापूर्वीच भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) व्हिडिओ KYC अनिवार्य केलं आहे. त्यामुळं आर्थिक क्षेत्रातील वाढत्या फसवणुकीदरम्यान या तंत्रज्ञाची मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
eKYC प्रक्रियेत क्रांती :हे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान pi-labs.ai च्या प्रगत डीपफेक डिटेक्शन तंत्रज्ञानाला Finex Solutions च्या अंतिम eKYC प्रणालीसह काम करतं. AI आधारीत होणाऱ्या घोटाळ्यांपासून त्यामुळं संरक्षण मिळले, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. डीपफेक व्हिडिओंमुळं मोठं आव्हान उभं आहे. विशेषतः क्रेडिट तसंच कर्ज प्रकरणात याचा विषेश वापर करता येणार आहे. फिनाकस सोल्युशन्सचे सह-संस्थापक राहुल अय्यपन सांगितलं की, "आधार-आधारित eKYC च्या एकत्रीकरणामुळं KYC खर्चात कमालीची घट झाली आहे. ज्यामुळं फिनटेक क्षेत्राला महत्त्वपूर्ण चालना मिळाली आहे. वित्तीय उद्योगाची अखंडता राखण्यात हित आहे. हे सुनिश्चित करण्यासाठी eKYC प्रक्रिया, डीपफेकद्वारे निर्माण होणारी सततची फसवणूक ही AI-आधारित KYC वर परत जाण्यास भाग पाडू शकते. pi-labs.ai आमच्या बँकिंग क्लायंटना वर्धित सुरक्षा प्रदान करेल." pi-labs.ai चे संस्थापक आणि CEO अंकुश तिवारी पुढं म्हणाले, "आमचे डीपफेक डिटेक्शन तंत्रज्ञान दोन्ही eKYC प्रक्रियेत क्रांती आणण्यासाठी तयार आहे.