महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

28 दिवसांच्या वैधतेसह सर्वात स्वस्त 3 रिचार्ज प्लॅन, मोफत कॉलिंगसह डेटाचा लाभ - Cheapest Jio Mobile Recharge - CHEAPEST JIO MOBILE RECHARGE

Cheapest Jio Mobile Recharge : मोबाईल रिचार्ज प्लॅनबाबत प्रत्येक ग्राहकांची वेगळी गरज असते. तुम्ही जिओ वापरकर्ते असाल आणि रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढल्यापासून स्वत:साठी स्वस्त रिचार्ज प्लॅन शोधत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त आहे. खरं तर, रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवूनही, खाजगी टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना स्वस्त रिचार्ज प्लॅन ऑफर करत आहेत.

Jio
जिओ (Jio)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 17, 2024, 3:25 PM IST

हैदराबाद : प्रत्येक युजरला त्याच्या स्मार्टफोनमध्ये मोबाईल रिचार्ज प्लॅनची ​​आवश्यकता असते. रिचार्ज प्लॅनशिवाय फोन वापरणं प्रत्येकासाठी अवघड होऊन बसतंय. अशा परिस्थितीत, प्रत्येक ग्राहकांची मोबाइल रिचार्ज करण्याची गरज वेगळी असते. मात्र, तुम्ही जिओचे ग्राहक असाल आणि रिचार्ज वाढल्यापासून तुम्ही स्वस्त रिचार्ज प्लॅन शोधत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.

खरं तर, रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवूनही, खाजगी टेलिकॉम कंपन्या त्यांच्या वापरकर्त्यांना स्वस्त रिचार्ज प्लॅन ऑफर करत आहेत. तुम्ही जिओचा २८ दिवसांचा रिचार्ज प्लॅन पाहू शकता. जिओ आपल्या वापरकर्त्यांना 28 दिवसांच्या वैधतेसह 3 रिचार्ज प्लॅन ऑफर करत आहे. फायद्यांनुसार प्रत्येक रिचार्जची किंमत बदलते. तुम्ही स्वतःसाठी २८ दिवसांचा रिचार्ज निवडू शकता.

जिओचा 28 दिवसांचा रिचार्ज प्लॅन :

99 रुपयांचा जिओ प्लॅन

पॅक वैधता- 28 दिवस

डेटा- 2GB

कॉलिंग- अमर्यादित

एसएमएस- 100 एसएमएस/दिवस

सदस्यता -JioTV, JioCinema, JioCloud

249 रुपयांचा जिओ प्लॅन :

पॅक वैधता- 28 दिवस

डेटा- 28GB, 1GB/प्रतिदिन

कॉलिंग- अमर्यादित

एसएमएस- 100 एसएमएस/दिवस

सदस्यता-JioTV, JioCinema, JioCloud

जिओचा 299 रुपयांचा प्लान :

पॅक वैधता- 28 दिवस

डेटा- 42GB, 1.5GB/प्रतिदिन

कॉलिंग- अमर्यादित

एसएमएस- 100 एसएमएस/दिवस

सदस्यता -JioTV, JioCinema, JioCloud

तुमच्यासाठी कोणता रिचार्ज प्लॅन योग्य? : Jio वापरकर्ते 28 दिवसांच्या वैधतेसाठी 3 पैकी एक प्लॅन निवडू शकतात. जर तुमची डेटा आवश्यकता नगण्य असेल तर तुम्ही 199 रुपयांचा Jio प्लॅन घेऊ शकता. यामुळे तुम्हाला तुमच्या गरजेनुसार नेट वापरायला मिळेल. तसंच तुम्हाला वेब ब्राउझिंग आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल. त्याच वेळी, जर तुमची डेटा आवश्यकता यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही 249 रुपयांचा रिचार्ज प्लॅन निवडू शकता. या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला दैनंदिन गरजांसाठी 1GB डेटा मिळतो. जर दैनंदिन गरजांसाठी 1GB डेटा कमी वाटत असेल, तर तुम्ही 1.5GB रिचार्ज प्लॅन निवडू शकता. 299 रुपयांचा रिचार्ज प्लॅन हा डेटा आवश्यक असलेला स्वस्त प्लान असेल.

ABOUT THE AUTHOR

...view details