नवी दिल्ली SANCHAR SAATHI :दूरसंचार मंत्रालयानं अनरजिस्टर्ड कॉल आणि नोंदणी नसलेल्या टेलि-मार्केटिंग कंपन्यांच्या विरोधात कारवाई करण्यास सुरवात केलीय. दूरसंचार विभाग आणि भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानं दूरसंचार क्षेत्रात सुधार करण्यासाठी अनेक महत्त्वाची पावलं उचलली आहेत. संचार साथीच्या मदतीनं आतापर्यंत 1 कोटींहून अधिक फसवे मोबाईल कनेक्शन तोडण्यात आलं आहेत. याव्यतिरिक्त, सायबर गुन्हे/आर्थिक फसवणूकीमध्ये गुंतलेले २.२७ लाख मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्यात आले आहेत.
दूरसंचार मंत्रालयानं सायबर फसवणुकीचा सामना करण्यासाठी नागरिक-केंद्रित प्लॅटफॉर्म संचार साथी (https://sancharsaathi.gov.in) लाँच केलं आहे. ज्यामुळं लोकांना संशयास्पद कॉल्स आणि मेसेजची तक्रार करता येते. संचार साथीच्या मदतीनं आतापर्यंत 1 कोटींहून अधिक फसवे मोबाईल कनेक्शन बंद करण्यात आले आहेत. याशिवाय, सायबर गुन्हे/आर्थिक फसवणुकीत गुंतलेले २.२७ लाख मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्यात आले आहेत. - दूरसंचार मंत्रालय
स्पॅम मुक्त दर्जाची दूरसंचार सेवा :त्याच वेळी, मंत्रालयानं उच्च गती डेटासह स्पॅम मुक्त दर्जाची दूरसंचार सेवा सक्षम करण्यासाठी अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. स्पॅम कॉलच्या समस्येला आळा घालण्यासाठी, मंत्रालयानं सांगितलं की, ट्रायनं दूरसंचार ऑपरेटरना रोबोकॉल आणि प्री-रेकॉर्ड केलेल्या कॉल्ससह स्पॅम कॉलसाठी बल्क कनेक्शन वापरून डिस्कनेक्ट आणि ब्लॅकलिस्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. गेल्या 15 दिवसांत, अशा 3.5 लाखांहून अधिक नंबर डिस्कनेक्ट केले गेले आहेत. 50 संस्थांना काळ्या यादीत टाकण्यात आलं आहे.
TRAI चे सुधारीत नियम जारी : याव्यतिरिक्त, नेटवर्कचं कार्यप्रदर्शन सुधारण्याच्या दृष्टीकोनातून, नेटवर्क पॅरामीटर्स, कॉल ड्रॉप रेट, पॅकेट ड्रॉप रेट इत्यादीसारख्या प्रमुख नेटवर्क पॅरामीटर्ससाठी बेंचमार्क कडक केले जातील. या संदर्भात TRAI नं त्यांचे सुधारित नियम जारी केले आहेत. सेवा गुणवत्तेची सेवा नियम, 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होतील.
'हे' वाचलंत का :
- तुम्हालाही शांत झोप येत नाहीय का? ऍपल वॉचमधील स्लीप एपनिया डिटेक्शन ठेवणार तुमच्या झोपीवर लक्ष - Apple Watch Series 10 Launch
- मारुती सुझुकीच्या कारवर मिळतेय बंपर सूट, ग्राहकांचे वाचणार पैसे - discount on Maruti Suzuki cars
- Hyundai Alcazar लाँच ; स्मार्टफोन, स्मार्टवॉचच्या माध्यमातून दरवाजे होतील लॉक अनलॉक - Hyundai Alcazar facelift Launched