महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

सोशल मीडियावर फोटो शेअर करण्यापूर्वी काळजी घ्या, सायबर गुन्ह्यांसाठी होतोय तुमच्या फोटोचा वापर - Cyber ​​criminals - CYBER ​​CRIMINALS

Cyber ​​criminals : सायबर गुन्हेगार तुमचे वैयक्तिक फोटो तसंच बायो डिटेल्स वापरून डुप्लिकेट खाती तयार करतात. त्यानंतर तुमच्या जवळच्या मित्रांकडून पैसे उकळण्यासाठी विविध कारण देऊन पैसे उकळतात. मात्र, या पासून काय काळजी घ्यावी, याबाबत पोलिसांचं काय मत आहे, चाला जाणून घेऊया...

Cyber ​​criminals
सायबर गुन्हेगार (source AI)

By ETV Bharat Tech Team

Published : Sep 25, 2024, 10:04 AM IST

हैदराबाद : आज प्रत्येक जण सोशल नेटवर्किंग साइट्स तुम्हाला दिसेल. ही एक प्रत्येकासाठी सामान्य गोष्ट आहे. मात्र, याचा फायदा सायबर गुन्हेगार घेत असल्याची अनेक प्रकरण तुम्ही पाहिली असेल. सायबर गुन्हेगार तुमचे फोटो, माहिती घेऊन तुमच्या जवळच्या मित्रांकडं पैशाची मागणी करू शकतात. तसंच तुमच्या बँक खात्यावर सायबर हल्ला करू करून रोकड पळवू सकता. त्यामुळं सायबर हल्ल्यांपासून सावध राहावं, असं पोलीस पोलीस विभागानं दिलेल्या माहितीत म्हटलं आहे.

फेक प्रोफाईल तयार : तंत्रज्ञान जसजसे विकसित होत आहे, तसतसे नवीन सायबर फसवणूक प्रकरणं समोर येत आहेत. लोकांची आयुष्यभराची कमाईही लुटली जात आहे. तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमचं प्रोफाईल तयार करून तुमच्या जवळच्या मित्रांकडून पैसे लुटलं जात आहेत. सायबर गुन्हेगार दिवसेंदिवस नवनवीन तंत्र अवलंबत आहेत. आजकाल सेल्फी तसचं वैयक्तिक छायाचित्रे सोशल मिडीयावर टाकणे सामान्य आहे. प्रत्येकाला आपले सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करायचे असतात. पण तुमची ही सवय तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकते, हे तुम्हाला माहीत आहे का? तुमचं वैयक्तिक तपशील आणि बँक खात्याची माहिती चोरण्यासाठी सायबर गुन्हेगार आता सेल्फीचा वापर करत आहेत. त्यामुळं सायबर गुन्हेगार तुमची खाजगी माहिती चोरून विविध गुन्हे करण्याची शक्यता आहे.

सायबर गुन्हेगारांची नवीन युक्ती : तुमच्या लक्षात आलंच असेल की अनेक ॲप्स, वेबसाइट्स तुम्हाला तुमची ओळख पटवण्यासाठी सेल्फी घेण्यास सांगतात. याला सेल्फी कन्फर्म म्हणतात. हे एक तंत्रज्ञान आहे, ज्यामुळं तुम्हाला तुमची ओळख सिद्ध करायची आहे. बहुतेक बँका, फिनटेक कंपन्या सेल्फीद्वारे लोकांची पडताळणी करतात. पण हेच तंत्र सायबर गुन्हेगार देखील वापरू शकतात. याद्वारे ते तुमचा फायदा घेऊ शकतात.

बनावट खाते तयार करणे :सोशल नेटवर्कवर तुमचं बनावट खातं तयार करून तुमच्या मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट सायबर गुन्हेगार पाठवतात. मग फ्रेंड रिक्वेस्टला परवानगी दिल्यानंतर ते तुमच्या सारखीच चॅटिंग करतात. तुमचा जवळचा मित्र देखील तुम्हीच आहात, म्हणून सायबर गुन्हेगारांशी चॅट करतील. त्यानंतर सायबर गुन्हेगार मला पैशांची गरज असून तातडीनं पैशांची देण्याची मागणी तुमच्या मित्राकडं करतील. आपण पैसे मागत आहोत, असा विचार करून तुमचे मित्र, नातेवाईक सायबर गुन्हेगारांना पैसे पाठवतात. त्यामुळं तुमच्यासह तुमच्या नातेवाईक तसंच मित्राची फसवणूक होते.

पोलीस काय म्हणतात? :बेंगळुरू सीआयडीच्या सायबर अधिकाऱ्यांनी सायबर हल्ल्यांबाबत सावध राहण्यास सांगितलं आहे. गेल्या काही वर्षात फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप यांसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर पोस्ट केलेली छायाचित्रे चोरून, वेगळी खाती तयार करून पैसे मागणाऱ्यांची संख्या वाढत आहे. इतकंच नाही तर ते इतर ॲप्सच्या माध्यमातून तुमचं बँक खातं लुटण्याचा प्रयत्न होत आहे. सेलिब्रेटींशिवाय सर्वसामान्यांची खाती सायबर चोरांकडून हॅक करून पैसे लुटले जात आहेत. सोशल मीडियावर वैयक्तिक फोटो टाकणाऱ्यांनी आधी अकाऊंटचं प्रोफाईल लॉक करावं. फेसबुकसह इतर खात्यांमध्ये वैयक्तिक फोटोंचे सार्वजनिक डोमेन रोखण्यासाठी प्रथम खाजगी मोड सेट केल्यास फोटोंचा गैरवापर टाळता येऊ शकतो.

ABOUT THE AUTHOR

...view details