मुंबई : देशाच्या राजधानीत प्रजासत्ताक दिनाच्या परेडची तयारी सुरू आहे. यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सामरिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रलय आणि लांब पल्ल्याची पिनाका रॉकेट प्रणाली प्रदर्शित केली जाईल. यावेळी भारताच्या स्वदेशी विकसित प्रणालींवर लक्ष केंद्रित होणार आहे. परेडमध्ये पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे प्रलय क्षेपणास्त्र प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये समाविष्ट होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
प्रलय चीनच्या सीमेवर तैनात
प्रलय क्षेपणास्त्र 500 किमी शत्रूच्या लक्ष्यांवर पारंपारिक हल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे. हे क्षेपणास्त्र चीनच्या सीमेवर तैनात करण्यात आलं आहे. पिनाका मल्टी-बॅरल रॉकेट लाँचर ही स्वदेशी बनावटीचं क्षेपणास्त्र आहे. त्याच्या विविध प्रणाली भारतीय लष्करात काम करताय. या क्षेपणास्त्राबाबत आर्मेनियासोबत निर्यात ऑर्डर आधीच पूर्ण झाली आहे. रॉकेटची श्रेणी 75 किमी आणि नंतर 150 किमीपेक्षा जास्त वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.