हैदराबाद 2025 Honda Amaze Launched In India : दीर्घ प्रतीक्षेनंतर, Honda नं अखेर नवीन जनरेशन Amaze भारतात लॉंच केली आहे. कंपनीनं ती 8 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किंमतीत लॉंच केलीय. या कारचं टॉप मॉडेल 10.90 लाखात खरेदी केलं जाऊ शकतं. ही कार 3 प्रकारांमध्ये ऑफर केली आहे. यात V, VX आणि ZX चा समावेश आहे.
डिझाइन : होंडानं Amaze चं अप्रतिम डिझाइन तयार केलं आहे. कारच्या पुढे LED, DRL लाईट देण्यात आले असू जे क्रोम फिनिशसह येतात. यात नवीन ड्युअल टोन 15-इंच अलॉय व्हील आणि इतर पार्ट कारला चांगला लूक देताय.
वैशिष्ट्ये :नवीन पिढीच्या अमेझला होंडा एलिव्हेटपासून प्रेरित केबिन देण्यात आली आहे. यासोबतच 8-इंच टचस्क्रीन, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 7-इंच MID, मल्टी-फंक्शनल स्टीयरिंग व्हील देण्यात आले आहेत. कारचं सेंटर कन्सोल एलिव्हेट प्रमाणेच वायरलेस चार्जिंग शेल्फ आणि यूएसबी पोर्टसह सुसज्ज आहे. यानंतर तुम्हाला येथे LED प्रोजेक्टर हेडलॅम्प देखील पहायाला मिळेल.
2025 Honda Amaze च्या केबिनमध्ये, तुम्हाला ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto, वायरलेस चार्जर, पुश बटण स्टार्ट/स्टॉप, मागील AC व्हेंट्स आणि मागील सीट आर्मरेस्ट मिळतात. सुरक्षेबद्दल बोलायचं झाल्यास, नवीन Amaze मध्ये 6 एअरबॅग, लेन वॉच कॅमेरा, हिल स्टार्ट असिस्ट, ESC आणि Honda चं सेन्सिंग ADAS आहेत. यासह, Amaze ADAS वैशिष्ट्यासह भारतातील सर्वात स्वस्त कार बनली आहे.
किती आहे मायलेज ? :होंडानं यात 1.2-लिटर चार-सिलेंडर पेट्रोल इंजिन दिलंय, जे 5-स्पीड मॅन्युअल आणि CVT गिअरबॉक्ससह येतं. हे शक्तिशाली इंजिन 90 HP पॉवर आणि 110 Nm पीक टॉर्क जनरेट करतं. कारचं इंजिन मॅन्युअल प्रकारात 18.65 किमी/लीटर आणि CVT गिअरबॉक्समध्ये 19.46 किमी/लीटर मायलेज देतं, असा कंपनीचा दावा आहे.
हे वाचलंत का :
- जग्वारनं सादर केली टाइप 00 इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट कार, पूर्ण चार्ज केल्यावर 770 किमीची देणार रेंज
- एमजी सायबरस्टर इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार लवकरच लॉंच होणार
- सर्वात स्वस्त Skoda SUV लाँच, Skoda Kylaq बुकिंग सुरू, जाणून घ्या Kylaq ची किंमत